कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने फायदा होतो हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे, पण एका नवीन संशोधनानुसार कच्च्या दुधामुळे बर्ड फ्लू होतो असा धक्कादायक दावुा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कच्च्या दुधामुळे बर्ड फ्लू किंवा इतर कोणताही मोठा आजार कसा होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. संशोधनानुसार, बर्ड फ्लूमुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
कच्च्या दुधामुळे इन्फ्लूएंझा किंवा बर्ड फ्लू पसरत असल्याचे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. बर्ड फ्लूची साथ अनेक ठिकाणी पसरत असतानाच हे संशोधन समोर आले आहे. संशोधन समोर आल्यानंतर, दुग्धउत्पादनासाठी हा एक मोठा सावधगिरी बाळगण्याचा इशारा आहे. कारण याआधी संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या उद्रेकाशी झुंजत असलेला आपण पाहिला आहे. म्हणूनच बर्ड फ्लू पसरू नये यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
फ्रीजमध्ये ठेवलेले दूध बनतंय बर्ड फ्लूचे कारण :
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, कच्चे दूध फ्रीजमध्ये 5 दिवस ठेवले तर ते बर्ड फ्लूचे सर्वात मोठे कारण ठरू शकते. लोक कच्चे दूध रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते उकळून चहा किंवा कॉफीसाठी वापरतात. संशोधनानुसार, फ्रिजमध्ये ठेवलेल्या दुधात बर्ड फ्लू किंवा इन्फ्लूएंझाचे जीवाणू 5 दिवस सुरक्षित राहतात. या काळात हे दूध वापरल्यास ते घातक ठरू शकते.
फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांमध्ये इन्फेक्ट होतात बॅक्टेरिया :
कच्चं दूध फ्रिजमध्ये 5 दिवस राहिल्यास त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या खाण्यापिण्याच्या इतर पदार्थांमध्येही संक्रमण करू शकतात, असेही संशोधनातून समोर आले आहे. यामुळे हा संसर्ग आणि विषाणू वेगाने पसरू शकतात.यामुळेच कच्चे दूध रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये असा इशारा संशोधकांनी दिला आहे. यासाठीच दूध गरम करून ते वापरणे आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.
गर्भवती महिलांसाठी खूप धोकादायक :
संशोधनानुसार, कच्च्या दुधामुळे गर्भवती महिलांचे सर्वात जास्त नुकसान होऊ शकते. यामध्ये असलेले बॅक्टेरिया महिलांच्या पोटात जातात आणि नवजात बाळाच्या हृदयावर परिणाम करू शकतात. यासोबतच ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत आहे त्यांच्यासाठीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले कच्चे दूध पिणे धोकादायक ठरू शकते.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य असे जपा
Edited By – Tanvi Gundaye