थंडीत सफेद किंवा काळे तीळ खाण्यावरुन बहुतांश लोक कंफ्यूज असतात. काही लोकांना असे वाटते की, काळे तीळ खाणे अधिक हेल्दी असते. तर काहीचा असा विचार असतो की, सफेद तिळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खरंतर दोन्ही तिळात पोषक तत्त्वे समान असतात. याचे सेवन केल्याने याचे अनेक फायदे आरोग्याला होतात. परंतु थंडीत काळे तीळ अधिक खाल्ले पाहिजेत. कारण ते अधिक फायदेशीर असतात. यामध्ये पोषक तत्त्वे ही सफेद तिळापेक्षा अधिक असतात.थंडीच्या दिवसात तिळाचे पदार्थ खुप मिळतात. काळ्या आणि सफेद तिळाचे लाडू, चिक्की आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, सफेद तिळाच्या तुलनेत काळ्या तिळात कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते. त्यामुळे थंडीत काळ्या तिळाचे लाडू, चिक्की खावे. यामुळे हाडं मजबूत होतात. काळ्या तिळाची टेस्ट क्रंची, क्रिस्पी आणि रस्टिक असते. तर सफेद तिळ सॉफ्ट, गोड आणि माइल्ड असते.
काळ्या तिळात सफेद तिळाच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्वे असतात. जी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. त्याचसोबत यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड थोडे अधिक असते. ते हार्टसह अन्य अवयवयांना हेल्दी ठेवण्यास मदत करते. त्याचसोबत फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, कॉपर, मॅग्नेशियम,फॉस्फोरस, अँन्टीऑक्सिडेंट्ससुद्धा खुप प्रमाणात असतात. काळे तिळ तुम्हाला काही आजारांपासून दूर ठेवतात.
थंडीत काही इंन्फेक्शन किंवा अन्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही काळ्या तिळाचे सेवन करू शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. जेणेकरुन शरीर आजारांच्या विरोधात लढण्यास सक्षम राहते. काळे तिळ खाल्ल्याने मेटाबॉलिज्मसुद्धा रेग्युलेट होते. तसेच मॅग्नेशियम असल्याच्या कारणास्तव ब्लड प्रेशर सुधारले जाते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असे तर तुम्ही काळ्या तिळापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाऊ सकता. काळे तिळ खाल्ल्याने स्मरणशक्ती उत्तम राहते, मेंदू उत्तम कार्य करतो.
हेही वाचा- शरीरातील व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे