Friday, November 29, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBlack Friday : 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे नक्की काय ?

Black Friday : ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणजे नक्की काय ?

Subscribe

‘ब्लॅक फ्रायडे’ हा दरवर्षी अमेरिकेत साजरा केला जातो. हा दिवस थँक्सगिव्हिंग डे च्या दुसऱ्या दिवशी अर्थात शु्क्रवारी साजरा करतात. या वर्षी हा दिवस 29 नोव्हेंबरला साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साधारणत: ख्रिसमस शॉपिंगच्या सीझनची सुरुवात असते. यामुळेच या दिवशी आपल्याला अनेक सोशल मीडिया साईटस् वर डिस्काऊंट ऑफर्स पाहायला मिळतात. काही दिवसांपासून तुम्ही ब्लॅक फ्रायडे आणि त्यानिमित्ताने मिळणाऱ्या डिस्काऊंटविषयी पाहत, वाचत असाल.

अशावेळी प्रश्न असा पडतो की ब्लॅक फ्रायडे आणि शॉपिंग साईटस् वर मिळणारे डिस्काऊंट यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ? जाणून घेऊयात ब्लॅक फ्रायडे म्हणजे नेमकं काय आणि याचा सेल व डिस्काऊंटसोबत काय संबंध आहे याविषयी.

- Advertisement -

काय आहे ब्लॅक फ्रायडे ?

ब्लॅक फ्रायडे हा प्रामुख्याने अमेरिकेत साजरा केला जाणारा सण आहे. हा दिन दरवर्षी थँक्सगिव्हिंग डे च्या पुढच्या दिवशी साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये प्रचलित असणारा हा दिवस गेल्या काही काळापासून जगभरातल्या अन्य भागांमध्येही साजरा केला जात आहे. या दिवसापासूनच ऑफिशियल फेस्टिव्ह सीझनची सुरुवात अर्थात ख्रिसमसच्या तयारीची सुरुवात होते आणि ब्लॅक फ्रायडेलाच ख्रिसमसची शॉपिंग सुरू केली जाते. हेच कारण आहे की या खासप्रसंगी दुकानदार आणि वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईटस द्वारे लोकांना सवलती दिल्या जातात.

Black Friday: What exactly is 'Black Friday'?

- Advertisement -

का साजरा केला जातो ब्लॅक फ्रायडे ?

या शब्दाची सुरुवात 1960 आणि 1970 च्या दशकात फिलाडेल्फिया पोलिसांनी केली होती. खरंतर या शब्दाचा वापर पोलिसांनी थँक्सगिव्हिंगच्या दुसर्‍या दिवशी शहरात माजलेल्या अराजक परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी केला होता. असं यासाठी कारण एका बाजूला जिथे फेस्टिव्हचा माहोल , विकेंडला ख्रिसमसची खरेदी आणि आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टीची मजा असं वातावरण असताना पोलिसांना मात्र रस्त्यांवर जमलेली गर्दी सांभाळावी लागत होती.

पोलिसांचे काम हे अविरत सुरू होते. त्यांच्या या न संपणाऱ्या कामामुळे त्यांनी या दिवसाला ‘ब्लॅक फ्रायडे’असं नाव दिलं. खरंतर, दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी याला ‘बिग फ्रायडे’ असं नाव देण्याचा प्रयत्न केला परंतु हा दिवस ‘ब्लॅक फ्रायडे’या नावाने प्रचलित झाला.

सध्या हा दिवस का साजरा केला जातो ?

सध्या ब्लॅक फ्रायडे दुनियेत श़ॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण दिवसांमधील एक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुकान आणि ऑनलाईन शॉपिंग साइटस दोन्ही ठिकाणी भरपूर सूट दिली जाते. ही एक सांस्कृतिक आणि आर्थिक घटना बनली आहे. जरी या दिवसाची सुरुवात अराजकतेने किंवा नकारात्मक झाली असली तरी आता मात्र दुकानदार आणि ग्राहक यांच्याकरता हा एक खास दिवस बनला आहे.

हेही वाचा : Relationship Tips : नात्यातील दुरावा कमी करेल 80/20 नियम 


Edited By – Tanvi Gundaye

 

- Advertisment -

Manini