वेळेआधीच केस पांढरे होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. त्यामुळे कमी वयात पांढऱ्या झालेल्या केसांना काळे करण्यासाठी विविध उपाय केले जातात. खुप जण केसांना मेहंदी, हेअर कलर लावतात. परंतु तुम्ही काही घरतुगी उपायांनी सुद्धा पांढऱ्या झालेल्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करु शकता. याच बद्दलच्या खास टीप्स आपण आज पाहणार आहोत. (Hair care tips)
कढीपत्ता
कढीपत्ता पांढऱ्या झालेल्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. केस काळे करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याची पाने घेऊन त्यात नारळाचे तेल किंवा जोजोबा ऑइल मिक्स करा. हे तेल काळ्या रंगाचे होत नाही तो पर्यंत गरम करा. नंतर कोमट झाल्यानंतर हळूहळू आपल्या स्कॅल्पला लावा. उत्तम रिजल्टसाठी तुम्ही ते रात्रभर लावून ठेवू शकता.
आवळा
आवळ्यात औषधी गुण असतात. मात्र केसांसाठी एक हर्बल उपचाराप्रमाणे काम करतो. आवळ्यात अँन्टीऑक्सिडेंट आणि अँन्टी एजिंग गुण असतात. आवळ्याचा रस केसांना लावण्यासाठी त्यामध्ये लिंबूचा रस मिक्स करा. थेट तुमच्या स्कॅल्पला लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
तसेच पावडर लावणार असाल तर त्यात नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा आणि हे मिश्र तो पर्यंत गरम करा जो पर्यंत रंग बदलणार नाही. कोमट झाल्यानंतर आपल्या केसांना आणि स्कॅल्पला लावा.
काळी चहा
काळ्या चहामध्ये टॅनिक अॅसिड असते. जे केसांना काळे आणि चमकदार बनवण्यासाठी ओळखले जाते. हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही टी बॅग किंवा चहा पावडर घ्या. मात्र त्यात साखर मिक्स करू नका. लावण्यापूर्वी ती थंड करा आणि नेहमीच स्वच्छ आणि ओलसर केसांना लावावी. कमीतकमी 30 मिनिटे तरी ती ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.
हेही वाचा- Hair care : केसांना मेहंदी लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे…