काळ्या अंडरआर्म्सची समस्या अनेकांसाठी शरमेचे कारण बनू शकते. ही समस्या मुख्यत्वे घाम, डिओड्रंटसचा अधिक वापर, वॅक्सिंग किंवा हार्मोनल बदल या कारणांमुळे होते. अनेक महिला टाल्कम पावडरचा वापर करतात. ज्यात अनेक केमिकल्स असतात. जे स्किन टोन खराब करू शकतात. यामुळेही त्वचा अधिक काळपट होते. काही वेळेस महिला अंडरआर्म्समधून चांगला सुगंध यावा याकरता टाल्कम पावडरचा वापर करतात आणि नंतर यामुळे होणाऱ्या समस्येची शिकार बनतात. जर तुम्हीदेखील या काळपटपणाची शिकार बनला असाल आणि या समस्येपासून सुटका मिळवू इच्छित असाल तर महाग उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक जेल्सचा वापर करा. हे जेल्स त्वचेला पोषण देण्यासोबतच त्वचेचा काळपटपणा घालवण्यासही मदत करतात. जाणून घेऊयात अशा काही प्रभावी जेल्सबद्दल आणि त्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल.
1. संत्र्याचे जेल :
एक मोठा चमचा संत्र्याचा रस
दोन व्हिटामिन्स कॅप्सूल्स
एक मोठा चमचा एलोवेरा जेल
विधी :
एका बाउलमध्ये संत्र्याचा ताजा रस घ्या.
आता यामध्ये व्हिटामिन -ई कॅप्सूलचे तेल टाका.
यात एलोवेरा जेल मिसळून चांगल्या पद्धतीने फेटून घ्या.
तयार मिश्रण अंडरआर्म्स वर लावून 20 मिनिटांकरता सुकू द्या.
कोमट पाण्याने धुवून घ्या आणि फडक्याने पुसन घ्या.
फायदे :
संत्र्याचा रस व्हिटामिन-सी ने युक्त असतो. जो त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवतो. व्हिटामिन- ई त्वचेला पोषण देते आणि तिला मुलायम बनवते. हे जेल त्वचेला थंडावा देते. हा जेल नियमितपणे अंडरआर्म्सच्या त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवते.
2. लिंबाचे जेल :
एक मोठा चमचा लिंबू रस
पाच थेंब रोजमेरी तेल
एक लहान चमचा गुलाब जल
विधी :
लिंबाच्या साली उकळवून त्याचे पाणी एका बाउलमध्ये काढून घ्या.
यामध्ये रोजमेरी तेल आणि गुलाब पाणी टाका.
या सर्व सामग्रीला चांगल्याप्रकारे एकत्र करा.
हे सर्व मिश्रण अंडरआर्म्सवर लावून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्या.
थंड पाण्याने धुवून हलक्या कपड्याने पुसून घ्या.
फायदे :
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुण असतात. जे त्वचेतील काळपटपणा घालवण्यास मदत करतील. रोजमेरी तेल हे त्वचेची सूज आणि संसर्ग यांना कमी करतो. इतकंच नव्हे तर अंडरआर्म्सचा काळपटपणाही घालवून त्याला सुगंधी आणि मुलायम बनवतो.
हेही वाचा : Back pain in winter : पाठदुखीने त्रस्त आहात?
Edited By – Tanvi Gundaye