Thursday, April 18, 2024
घरमानिनीब्लँकेट्स, चादरींना कुबट वास येतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

ब्लँकेट्स, चादरींना कुबट वास येतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Subscribe

अंथरूण, पांघरूण व्यतिरिक्त कपाटात किंवा दिवानाच्या बॉक्समध्ये एक्स्ट्राचे अनेक कपडे असतात. पाहुण्यांसाठी किंवा थंडीमध्ये जास्तीची पांघरूणं लागतात म्हणून ती साठवून ठेवलेली असतात. बऱ्याचदा नेमकं होतं काय की पाहूणे आले म्हणून त्यांच्यासाठी आपण ही साठवणीतली एक्स्ट्राची पांघरूणं, बेडसीट्स काढतो, पण नेमका त्याचाच कुबट वास येऊ लागतो. म्हणूनच तर असं होऊ नये यासाठी काही सोपे घरगुती उपाय करून बघा.

सूर्यप्रकाशात ठेवा

सूर्याच्या प्रकाशात काही वेळ तु्म्ही जर तुमचे वापरलेले अथवा कपाटात ठेवलेले ब्लॅंकेट ठेवले तर त्यातील दुर्गंध दूर होतोच शिवाय ब्लॅंकेट निर्जंतूक होतात. उन्हात ठेवल्यामुळे जीवजंतूंचा नाश होतो आणि ब्लॅंकेट पुन्हा वापरण्यासाठी सुरक्षित ठरतात. दिवसभर कमीत कमी दोन तास तरी ऊन देणं यासाठी गरजेचं आहे. उन्हात ठेवल्यानंतर पुन्हा लगेच ब्लॅंकेट कपाटात ठेवू नका. थोड्यावेळ असेच मोकळ्या हवेवर ठेवा आणि मग ते कपाटात ठेवून द्या.

- Advertisement -

एअर फ्रेशनर वापरा

ब्लॅंकेट कपाटात ठेवायचंच असेल तर तुम्ही त्याला वास येऊ नये यासाठी एअर फ्रेशनर वापरू शकता. यासाठी घरीच एअर फ्रेशनर बनवणं खूप सोपं आहे. बेकींग सोडा आणि कोणत्याही इसेंशिअल ऑईलचा वापर तुम्ही करू शकता. हे मिश्रण कपाटात ठेवा ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कपाटालाच छान वास येईल ज्यामुळे ब्लॅंकेटचा वास नक्कीच कमी होईल.

कापूर वडीचा वापर

वापरुन झाल्य़ानंतर चादरी आपण वर्षभरासाठी बॅगेत बंद करुन ठेवतो , चादरी, ब्लँकेट्स बॅगेत व्यवस्थित घडी घालून ठेवाव्यात या चादरींमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्यात जेणेकरुन त्यांना कुबट वास न येता कापूरचा सुगंध येईल.

- Advertisement -

व्हिनेगरचा वापर

किचनमधील भांडी स्वच्छ करण्याबरोबरच कपड्यांच्या धुलाईमध्ये सुद्धा व्हिनेगरचा वापर केला जातो. ब्लँकेट्स किंवा चादरी धुताना त्यात थोडे व्हिनेगर घालून धुतल्यास कुबट वास निघून जातो.

चादर घरात पसरुन ठेवा

काही वेळा ढगाळ वातावरण असतं. अशा परिस्थितीत एका खोलीत पांघरुणाची पुर्ण घडी सोडून ते घरात पसरवून ठेवावं. आणि खोलीतील पंखा चालू ठेवावा

- Advertisment -

Manini