तरुणांमध्ये ऑनलाईन डेटिंगचा ट्रेंन्ड वाढत चालला आहे. तरीही समोरासमोर भेटण्याचा प्रयत्न केला जातो. ऑनलाईन डेटिंगनंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या अज्ञात व्यक्तीला भेटण्यासाठी जात असाल तर अशा ब्लाइंड डेटिंगपूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी. जेणेकरुन तुमची सुरक्षितता ही कायम राहिल.
-सार्वजनिक ठिकाणी भेटा
पहिल्यांदा एखाद्या अज्ञात पार्टनरला भेटण्यासाठी जात असाल तर त्याला सार्वजनिक ठिकाणी भेटा. जसे की, एखादे रेस्टॉरंट अथवा पार्क. जेथे खुप लोक असतील तेथे जा.
-स्वत: निवडा भेटण्याचे ठिकाण
स्वत: ची सुरक्षा तुमच्याच हातात असते. त्यामुळे प्रयत्न करा की, जेव्हा त्याला भेटण्यासाठी प्लॅन कराल तेव्हा त्याला तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी बोलवा. असे केल्याने तुम्ही स्वत: सुरक्षितत रहाल.
-सोबत ठेवा सेल्फ डिफेंस टूल्स
जेव्हा तुम्ही ब्लाइंड डेटवर जाता तेव्हा आपल्यासोबत सेल्फ डिफेंस टूल जरूर ठेवा. जेणेकरुन एखादे दुर्घटना होणार असेल तर त्या गोष्टी कामी येतील.
-सतर्क रहा
आपल्या व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा तुम्ही अन्कंम्फर्टेबल होत असाल तर तेथून निघून जा.
-खाण्यापिण्याबद्दल सावधगिरी बाळगा
जेव्हा एकाद्या कॅफे मध्ये जाता तेव्हा तेथे खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात. तेव्हा नेहमीच लक्ष द्या की, तेथे तुमच्या ड्रिंक किंवा खाण्यामध्ये काही मिक्स करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना.
-व्हिडिओ चॅट किंवा फोन कॉल्स
ऑनलाईन डेटिंगवेळी बहुतांश लोक चॅटिंगच्या माध्यमातूनच एकमेकांशी बोलणे पसंद करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा भेटण्याचा प्लॅन कराल तेव्हा सर्वात प्रथम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कंम्फर्म करा की ज्या व्यक्तीचा फोटो डीपी दिसतोय तो तोच आहे.
-कंम्फर्म करा आइडेंटिटी
आजकाल ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता अधिक वाढली गेली आहे. काही लोक अन्य लोकांची माहिती फसवणूकीसाठी वापरतात. अथवा बनावट अकाउंट तयार करतात. त्यामुळे त्या व्यक्तीची सोशल मीडिया साइट्स किंवा अन्य पद्धतीने त्याची अधिक माहिती मिळवा. त्यानंतरच त्याला भेटण्यास जा.
हेही वाचा- ब्रेकअपचे ‘हे’ आहेत संकेत