Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसण्याची 'ही' आहेत लक्षणे

ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसण्याची ‘ही’ आहेत लक्षणे

Subscribe

आपल्या शरिराची संरचना अशी आहे ज्यामध्ये लहान-लहान अवयव सुद्धा एकमेकांना जोडले जातात. एखाद्या अवयव दुखण्यास सुरुवात झाली की, आरोग्य प्रभावित होते. तुमच्या शरिरात उर्जा असणे आणि योग्य पद्धतीने काम करण्यासाटी तुमचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत असणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा काही हेल्थ प्रॉब्लेम्स येऊ शकतात. योग्य पद्धतीने ब्लड सर्कुलेनश होत नसेल तर हृदयासंबंधित समस्या अधिक वाढू शकतात.

बदलेली लाइफस्टाइल आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशनवर त्याचा वाईट परिणाम होतो. शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नसेल तर पुढील काही लक्षणे दिसून येतात.

- Advertisement -

पाठीवर दाणे येणे
पाठीवर आलेले लाल दाणे हे तुम्हाला खराब ब्लड सर्कुलेशनचे लक्षण असू शकते. खरंतर यामुळे त्वचेपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितीतरित्या पोहचत नाही. त्याचसोबत पोर्स ही बंद होऊ लागतात. यामुळेच पाठीवर दाणे येऊ लागतात.

शरिराला मुंग्या येणे
ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसेल तर शरिरातील कोणत्याही अवयवाला मुंग्या येऊ लागतात. खरंतर जेव्हा ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसते तेव्हा शरिरातील नसा या व्यवस्थितीत काम करत नाहीत.

- Advertisement -

चेहरा निळसर होणे
शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित नसल्यास चेहरा निळसर होऊ शकतो. यामागील कारण असे की, शरिरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असेल.

पायांना सूज येणे
तुमच्या हातापायांना सूज येऊ शकते. जेव्हा तुमचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसते तेव्हा तुमच्या पायाजवळ रक्त येऊन थांबते आणि यामुळे पायांना सूज येते.


हेही वाचा- तुमच्या शरिरात दररोज जाताहेत ‘हे’ टॉक्सीन

 

- Advertisment -

Manini