Friday, March 28, 2025
HomeमानिनीHealthBoard Exam 2025 : परीक्षेचा ताण दूर करा या योगासनांनी

Board Exam 2025 : परीक्षेचा ताण दूर करा या योगासनांनी

Subscribe

बोर्ड परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाची पायरी असते. प्रत्येक मुलाला या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतात, जेणेकरून त्याच्यासाठी पुढील करियरचे मार्ग खुले होतील. परीक्षेचा दबाव आणि चांगली कामगिरी करण्याची चिंता मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत, जाणून घेऊयात काही अशा योगासनांबद्दल जे परीक्षेदरम्यान केल्यास केवळ ताण कमी होणार नाही तर आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होईल.

ताडासन

Board Exam 2025 : Eliminate exam stress with these Yogasanas

ताडासन करण्यासाठी , जमिनीवर सरळ उभे रहा.
दोन्ही पायांची बोटे आणि टाचा एकमेकांना चिकटवून उभे रहा.
यानंतर, हात एकेमकांना जोडा आणि शरीराला वरच्या दिशेने खेचा.
तुमच्या पायांच्या टाचाही वर करा.
पायाच्या बोटांवर शरीराचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या क्षमतेनुसार या स्थितीत रहा आणि हळूहळू रिलॅक्स व्हा.

पश्चिमोत्तानासन

Board Exam 2025 : Eliminate exam stress with these Yogasanas

शांत ठिकाणी मांडी घालून चटईवर बसून दीर्घ श्वास घ्यावा.
आता तुमचे दोन्ही पाय समोरच्या दिशेने पसरा.
लक्षात ठेवा की या काळात तुमचे पाय आणि टाच दोन्ही एकत्र असतील.
आता स्वतःला पुढे वाकवा आणि दोन्ही पायांची बोटे हातांनी धरा.
तुमचे कपाळ तुमच्या गुडघ्यांवर ठेवा आणि तुमचे कोपर जमिनीवर ठेवा.
स्वतःला या स्थितीत 30 ते 60 सेकंदांसाठी ठेवा.
आता श्वास घेत पुन्हा आधीच्या स्थितीत या.

बालासन (बाल पोज)

Board Exam 2025 : Eliminate exam stress with these Yogasanas

बालासन करण्यासाठी, चटईवर वज्रासनात बसा.
म्हणजेच दोन्ही पाय मागच्या दिशेला दुमडून बसा.
यानंतर, श्वास घेत असताना, तुमचे दोन्ही हात वर करा.
जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा पुढे झुका
तुमचे तळवे जमिनीला स्पर्श करेपर्यंत खाली वाका.
यानंतर, तुमचे डोके जमिनीवर ठेवा.
या आसनात आल्यानंतर, श्वास घ्या आणि सोडा.
कमीत कमी दोन ते तीन मिनिटे या स्थितीत रहा.
आता हळू हळू उठा, टाचांवर बसा आणि हळू हळू तुमचा पाठीचा कणा सरळ करा.
हे तुम्हाला ताण कमी करण्यास मदत करेल.

हेही वाचा : Kitchen Tips : कॉपरची भांडी अशी करा साफ


Edited By – Tanvi Gundaye

Manini