Thursday, March 27, 2025
HomeमानिनीHealthBoard Exam 2025 : परीक्षाकाळात स्मरणशक्ती वाढवतील हे ब्रेन फूड

Board Exam 2025 : परीक्षाकाळात स्मरणशक्ती वाढवतील हे ब्रेन फूड

Subscribe

परीक्षेचा काळ म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय तणावाचा काळ. बऱ्याचदा मुलं तासन् तास अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांना वेळेचे भान नसते आणि ते त्यांच्या खाण्यापिण्याकडेही विशेष लक्ष देत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडू लागतो. काही मुलांच्या तर कमकुवत स्मरणशक्तीमुळे त्यांनी कितीही वाचलं तरीदेखील त्यांच्या लक्षात राहत नाही. अशात आपल्या आहारात जर काही पोषकतत्त्वांचा समावेश केला गेला तर स्मरणशक्ती तेज होईलच पण आरोग्यही निरोगी राहू शकेल.

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फॅटी फिश जसे की बांगडा, सुरमई, टूना मासा यांच्यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात. मेंदूतील पेशी मजबूत करण्यासाठी या पोषक तत्त्वांचा उपयोग होतो. याच्या नियमित सेवनाने मानसिक तणावदेखील कमी होतो. ज्यामुळे परीक्षेदरम्यान चांगला परफॉर्मन्स देता येऊ शकतो.

कॉफीमध्ये कॅफेन आणि एंटीऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूला ऍक्टिव्ह आणि अलर्ट करतात. हे स्मरणशक्ती बूस्ट करण्यासोबतच आपला मूडदेखील सुधारतात. संशोधनानुसार, कॉफी अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराचे प्रमाण कमी करण्यातही मदत करतात.

Board Exam 2025 : This brain food will increase your memory during the exam

ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सिडंट्स असतात. जे ब्रेन एजिंगची प्रक्रिया सावकाश करतात आणि स्मरणशक्ती अधिक तल्लख बनवतात. हे फळ मेंदूतील पेशींना फ्री रेडिकल्सपासून वाचवण्यात मदत करते, ज्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याती क्षमता अधिक मजबूत होते.

हळद आणि त्यात असलेला करक्यूमिन घटक हा एंटीऑक्सिडंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी गुणांनी युक्त असतो. जे मेंदूकरता अत्यंत फायदेशीर असते. संशोधनानुसार, हळद अल्झायमरची लक्षणे कमी करते आणि डिप्रेशन कमी करण्यासही मदत करते.

ब्रोकोलीमध्ये विटामिन के आणि सल्फोराफेन अशी पोषकतत्त्वे असतात. ज्यामुळे मेंदू अधिक कार्यशील होतो. याच्या सेवनाने मानसिक थकवा दूर होतो आणि एकाग्रतादेखील सुधारते.

भोपळ्याच्या बियांमध्ये कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम आणि झिंक पुरेशा प्रमाणात असतात. हे केवळ ब्रेन फंक्शनसाठी गरजेचे नसतात. या तत्त्वांमुळे केवळ मेंदू तल्लख होत नाही तर मानसिक तणावदेखील कमी करण्यास यामुळे मदत होते.

बदाम, अक्रोड आणि काजू यासारख्या ड्रायफ्रूट्समध्ये विटामिन इ, हेल्दी फॅट्स आणि प्लांट कंपाउंड्स असतात. जे स्मरणशक्ती तल्लख करण्यास मदत करतात. रोज मूठभर नट्स खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. आणि परीक्षेदरम्यान लक्ष केंद्रित करणे सोपे जाऊ शकते.

जर तुम्ही तुमच्या आहारात ब्रेन बूस्टिंग फूडचा समावेश करणार असाल तर यामुळे केवळ तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारणार नाही तर परीक्षेदरम्यान निर्माण होणारा तणावही कमी होईल.

हेही वाचा : Board Exam 2025 : परीक्षेचा ताण दूर करा या योगासनांनी


Edited By – Tanvi Gundaye

Manini