Monday, January 20, 2025
HomeमानिनीDiwali 2024 : दिवाळीनंतर आरोग्याची घ्या अशी काळजी

Diwali 2024 : दिवाळीनंतर आरोग्याची घ्या अशी काळजी

Subscribe

दिवाळीच्या सणात फराळ, मिठाई खाण्यात येते. काही वेळा तर सणानिमित्ताने नातेवाईक एकत्र आल्याने बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड असे अस्वाथ्यकर पदार्थ खाल्ले जातात. पण, अशा पदार्थामुळे शरीराचे स्वास्थ बिघडते. जास्त तळेलेले पदार्थ आणि मिठाई खाल्यामुळे शरीरात एक प्रकारचा आळस येतो आणि सुस्ती जाणवते. शरीराचा आळसपणा आणि सुस्ती घालवण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक असते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊयात, दिवाळीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यायची,

पाणी प्या –

शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी पाणी पिणे सर्वात सोपा उपाय मानला जातो. त्यामुळे दिवाळीनंतर शक्य तितके पाणी प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही सतत लघवीला सुद्दा जायला हवे. जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि तुम्हाला हलके वाटेल.

मासांहार करू नका –

सणासुदीच्या दिवसात मांसाहारी पदार्थ खाणे टाळायला हवे. या दिवसात तुम्ही हलके फूलके पदार्थ खायला हवेत, जेणेकरून पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही आणि पोटाचे आरोग्य व्यवस्थित राहते. तिखट, तेलकट पदार्थ पचण्यास हलके नसतात,त्यात जर तुम्ही मासांहार केलात तर पोट बिघडण्याची शक्यता असते.

साखर खाऊ नका –

सणाच्या दिवसात साखरेची मिठाई जास्त प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही साखरेचे पदार्थ खाणे टाळायला हवे. यात बेकरी प्रॉडक्ट, कोल्ड ड्रिंक्स असे पदार्थ खाणे टाळायला हवे.

फायबरयुक्त पदार्थ खा –

आहारात फायबरयुक्त पदार्थ तुम्ही खायला हवेत. फायबरयुक्त पदार्थ शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. यात तुम्ही काकडी, गाजर, मोड आलेली कडधान्ये खाऊ शकता. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हे सर्व पदार्थ पचण्यास हलके असतात.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini