हाडांचा कॅन्सर हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. जो आपल्या शरीरातील हाडांमध्ये होतो. अन्य कॅन्सरच्या प्रकारांप्रमाणे याबद्दल ही जाणून घेणे गरजेचे असते. हाडांमध्ये सातत्याने येणारी सूज, लहान दुखापतीमुळे फ्रॅक्चर आणि स्नायू दुखत राहणे ही सर्व हाडांच्या कॅन्सरची सर्वसामान्य लक्षणे आहेत. परंतु डॉक्टर असे म्हणतात की, पाठ दुखी आणि विशेषकरुन खालील हिस्स्याच्या येथे दुखत असेल तर हे हाडांच्या कॅन्सरचे सर्वसामान्य लक्षण आहे. जर सतत दुखत असेल किंवा अन्य संबंधित कारणाशी निगडीत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटले पाहिजे.
डॉक्टर असे म्हणतात की, जर एखाद्याला हाडांचा कॅन्सर झाला असेल तर त्याची कंबर दुखत राहते. त्याचसोबत तो पाठीच्या कण्याजवळ एखाद्या विशिष्ठ ठिकाणी असेल किंवा आसपासच्या एरियात झालेला असू शकतो. हे दुखणे वाढले जाते आणि तुम्हाला दररोजची कामे करणे अशक्य होते.
या व्यतिरिक्त हाडांच्या कॅन्सरमध्ये रात्री किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी झाल्यास अधिक त्रास देऊ शकतो. तुमची पाठ खुप दुखत असेल आणि कोणतीही दुखापत झाली नसेल तर हा एक चिंतेचा विषय आहे. या व्यतिरिक्त एखाद्यासा हाडांमध्ये सूज किंवा दुखत असलेल्या ठिकाणी एखादी गाठ दिसून येत असेल तर हाडांमध्ये ट्युमरचे संकेत असू शकतात. जर तुमच्या परिवारात एखाद्याला कॅन्सर होता तर तुम्हाला सुद्धा होण्याची शक्यता असते. हाडांच्या कॅन्सर कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकते. जर तुमच्या मुलाला सतत पाठ दुखीचा त्रास असेल तर डॉक्टरांना भेटा.
हेही वाचा- हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी खा ‘हे’ फूड्स