Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल लसणाची चविष्ट चटणी खाऊन वाढवा रोगप्रतिकार शक्ती

लसणाची चविष्ट चटणी खाऊन वाढवा रोगप्रतिकार शक्ती

लसणामधे अनेक असे गुणकारीतत्व असतात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक कडक निर्बंध शासनातर्फे लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस पासून बचावासाठी रोगप्रतीकार शक्ती वाढवणे किंवा मजबूत करणे हे अत्याधीक महत्वाचे आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात येत आहेत. रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य व्यायाम, प्राणायम करण्या बरोबरच योग्य आहारचे देखील महत्व आहे.
घरोघरी अगदी सहजरीत्या आढळणारी तसेच जेवणात नेहमी समाविष्ट असणारी गोष्ट म्हणजे लसूण. लसणामधे अनेक असे गुणकारीतत्व असतात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हाला कच्चे लसूण खाणे पसंत नसेल तर लसणाची एक छान रेसीपी तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे नआवडणारे लसूण सुद्धा तुम्ही दररोज खाऊ शकतात. यामुळे तुम्हाला अरोग्यदायी फायदे होण्यासोबतच जेवणामध्ये खाण्यासाठी चविष्ट खाद्य उपलब्ध होईल.

काय आहेत लसूण खाण्याचे फायदे?

- Advertisement -

यूनिवर्सटी ऑफ फ्लोरिडा च्या वैज्ञानिकांनी क्लिनिकल न्यूट्रिशन जरनल मध्ये एक अहवाल प्रकाशित केला आहे. अहवाला नुसार सर्दी आणि खोकला झाल्यास लसणाचा रस घेतल्यास लगेच बारा होतो. पण लसूण कच्चे खल्यास शरीराला जास्त उपयोगी ठरू शकते. तसेच लसूण आपल्या शररातील पाचन क्रिया सुरळीत चालू ठेवतो. जर तुम्हाला कच्चे लसूण खाण्यास आवडत नसेल तर तुम्ही याची चटणी बनवून देखील खाऊ शकतात. या चटणीला इंग्रजी भाषेत इम्युनिटी बुस्टर चटणी असे म्हंटले जाते.

सामग्री
४ लसणाच्या पाकळ्या
१/२ चमचा मोहरीचे तेल
१ टोमॅटो
१ हिरवी मिर्ची
मीठ स्वादानुसार
साखर स्वादानुसार

- Advertisement -

चटणी बणवण्याची विधी
सर्वात आधी टोमॅटो, लसूण,आणि मिर्ची यांना गॅस वर हलके भाजून घेणे, यनांनतर हे मिश्रण गार झाल्यावर त्यावरील साली काढून घेणे व मिक्सर मध्ये सगळे मिश्रण एकत्र करून   तेल,मीठ,साखर टाकून अगदी बारीक वाटून घेणे. यानंतर एका बाऊल मध्ये सर्व करून घेणे.


हे हि वाचा – रात्री उशिरा जंकफूड खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी कामावर होतो परिणाम?

- Advertisement -