Monday, January 20, 2025
HomeमानिनीRelationshipRelationship Tips : नातं टिकवायचंय? मग या गोष्टी पाळाच !

Relationship Tips : नातं टिकवायचंय? मग या गोष्टी पाळाच !

Subscribe

कोणतेही नाते टिकविणे हे तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी नसते. नाते टिकवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. नात्यात केवळ प्रेम असून चालत नाही तर प्रेमासोबत आपूलकी, काळजी, जबाबदारी या सर्व गोष्टीची जाणीव असणे आवश्यक असते. यासोबतच नात्यात काही सिमा असणे देखील गरजेच्या असतात. अनेकांकडून या सिमा पाळल्या जात नाही. परिणामी, भांडण, गैरसमज निर्माण होतात. अशाने गोष्ट घटस्फोटापर्यत पोहोचते.

अशा परिस्थितीत जर तुम्ही काही योग्य सिमा नात्यात पाळल्यात तर नाते अधिक घट्ट होऊ शकते. जाणून घेऊयात, कोणत्या सिमा तुम्ही पाळायला हव्यात,

पर्सनल स्पेस महत्वाची –

  • तुम्हाला जर तुमचे नाते टिकवायचं असेल तर तुम्ही जोडीदाराला पर्सनल स्पेस द्यायला हवा.
  • केवळ जोडीदारालाच नाही तर तुम्ही सूद्धा पर्सनल जपायला हवी. नात्यातील पर्सनल स्पेसमुळे ताणतणाव कमी होऊन नाते टिकण्यासाठी मदत होते.
  • काही वेळा आपण जोडीदाराकडून चुकीची अपेक्षा करतो, की त्याने त्याचा संपूर्ण वेळ आपल्यालाच द्यावा. पण, तुमच्या अशा वागण्याने नात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • नात्यात पर्सनल स्पेस खूप महत्ताची भूमिका बजावते, त्यामुळे दोघांनीही ती जपायला हवी.

आर्थिक गोष्टी समजून घ्यायला हव्यात –

  • कधी कधी नात्यात आर्थिक गोष्टी समजून न घेतल्यास गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे दोघांनीही आर्थिक गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
  • जर दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करणारे असतील तर घराच्या गोष्टी दोघांनीही सांभाळायला हव्यात.
  • जर दोघांपैकी एका कोणाची कमाई जास्त आणि दुसऱ्याची कमी असेल तर तेही समजून घ्यायला हवे.
  • हल्ली महागाईमुळे दोघांकडेही उत्पनाचे साधन हवे आहे. कारण आर्थिक स्थितीमुळे वादविवाद होणार नाहीत.
  • दोघांनीही महिन्याच्या सुरूवातीला किंवा महिन्यातून एकदा खर्चावरून चर्चा करायला हवी.

बोलण्याची सिमाही हवी –

  • काहीवेळा आपण पाहतो की, नवरा गृहिणी असणाऱ्या बायकोला वाटेल ते बोलतो, तिचा आदर करत नाही. अशाने दोघांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते.
  • नाते टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवे.
  • तसेच कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचे मत अवश्य घ्यायला हवे.
  • सर्वात शेेवटचे आणि महत्त्वाचे एकमेकांचा आदर करायला हवा. आदर केल्याशिवाय नाते टिकूच शकत नाही.

एकदंरच, नात्यात एकमेकांना समजून घेतल्यास, आदर केल्यास नात्यावर आणि काही योग्य सिमा पाळल्यास नात्यावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini