घरलाईफस्टाईलजीभ पिवळी पोटात असह्य वेदना, लहान मुलांमध्ये दिसतायंत विचित्र लक्षणे

जीभ पिवळी पोटात असह्य वेदना, लहान मुलांमध्ये दिसतायंत विचित्र लक्षणे

Subscribe

एका १२ वर्षीय लहान मुलामध्ये एका आजाराची काही विचित्र लक्षणे आढळल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. या मुलाची जीभ चक्क पिवळी पडली असून त्याला पोटात असह्य वेदना होत आहेत. हा मुलगा ‘ऑटोम्यून डिसॉर्डर’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे आढळले आहे. या आजारात मुलाची रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील लाल रक्तपेशांवर हल्ला करत असून ज्यामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे.

जीभ पिवळी झाल्याचे पाहून डॉक्टरही चिंतेत

‘दि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ च्या वृत्तानुसार, या मुलाच्या शरीरात काही गंभीर लक्षणे दिसल्याने त्याला टोरोंटो (कॅनडा) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, या मुलामध्ये घसा खवखवणे, लघवी पिवळे होणे, पोटात दुखणे आणि त्वचेचा रंग पिवळा पडणे अशी लक्षणे आढळली. सध्या मुलाची प्रकृती नाजूक आहे. ही लक्षणे पाहून डॉक्टरांना वाटले की, त्या कावीळ (कावीळ) झाली आहे. कारण कावीळ या आजारात त्वचेचा रंग, नखं आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होतो. परंतु जीभ पिवळी झाल्याचे पाहून डॉक्टरही चिंतेत पडले.

- Advertisement -

 एनिमिया आणि एपस्टीन-बार व्हायरसचा संसर्ग

काही चाचण्या केल्यानंतर या मुलाला एनिमिया आणि ‘एपस्टीन-बार व्हायरस’चा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा एक असा व्हायरस आहे जो सामान्यत: मुलांना संक्रमित करतो ज्यामुळे ऑटोम्यून डिसॉर्डरसारखी अनेक लक्षणे दिसतात. थंड तापमानामुळे आजार आणखी वाढतो. सध्या मुलाच्या पिवळ्या जिभेचा एका फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टरांचे मते, या मुलाला एपस्टीन-बार विषाणूची लागण झाल्यानंतरच तो कोल्ड एग्लूटिनिन या आजाराचा शिकार झाला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, कोल्ड एग्लूटीनिनमुळे शरीरातील लाल रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात आणि बिलीरुबिन नावाचा पिवळा संयुग तयार होऊ लागतो. या रासायनिक संयुगामुळे लोकांना कावीळ हा आजार होतो. ब्लड ट्रान्सफ्यूशन आणि स्टेरॉइड्सच्या मदतीने या आजारावर उपचार केले जातात. सध्या या मुलावर उपचार सुरु असून रोगप्रतिकार शक्ती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

कोल्ड एग्लूटीनिन आजाराची लक्षणे

थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, हात पाय थंड पडणे आणि त्वचेचा रंग पिवळसर पडणे अशी लक्षणे आढळतात. याव्यतिरिक्त लघवी पिवळी होणे, छातीत दुखणे, हात पाय दुखणे, अतिसार आणि उलट्या ही लक्षणे देखील दिसू शकतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -