Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Boyfriend-Girlfriend on rent: रोमँटीक डेट असो किंवा डिनर येथे भाड्याने मिळतो पार्टनर

Boyfriend-Girlfriend on rent: रोमँटीक डेट असो किंवा डिनर येथे भाड्याने मिळतो पार्टनर

Subscribe

पैशाने सर्वकाही खरेदी करता येते. पण गेल्या काही वर्षांपासून लाइफस्टाइल बदलली आहे. तरीही लोक आजही असा दावा करतात प्रेम अशी गोष्ट आहे जी खरेदी करता येऊ शकत नाही कारण ते अमूल्य आहे. परंतु सध्या प्रेम खोटं असतं हे दाखवण्यासाठी काही देश याची किंमत ठरवू लागले आहेत. हे सत्य असून चीन आणि जपान मध्ये याचे एक अनोखे मार्केट लॉन्च केले गेलेयं. लॉन्चिंगनंतर ग्राहकांची यासाठी खुप गर्दी केलीच पण लोक त्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार होतात.

गर्लफ्रेंन्ड-बॉयफ्रेन्ड ऑन रेंट म्हणजेच तुम्ही काही वेळासाठी इमोनशल इंटीमेसीचा अनुभव करण्यासाठी एखादा तरुण किंवा तरुणी भाड्याने घेऊ शकता. अशातच तुम्हाला येथे एखाद्याला इंप्रेस करायचे नाही किंवा समोरच्या व्यक्तीचा होकार येईल की नाही याची सुद्धा वाट पहावी लागत नाही. यामध्ये एकच अट आहे तुमच्याकडे बक्कळ पैसा असला पाहिजे. कारण पार्टनर भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला तासानुसार पैसे मोजावे लागतात. जर तेवढे पैसे नसतील तर हा ऑप्शन तुमच्यासाठी नाही.

- Advertisement -

जापानी अॅपवर गर्लफ्रेंन्ड किंवा बॉयफ्रेंन्ड भाड्याने घेण्यासाठी $30 ते $150 प्रति तास दरम्यान आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार तुम्हाला यासाठी 2,481 ते 12408 रुपये मोजावे लागतील. या व्यतिरिक्त जर तुम्ही पार्टनरसोबत फिरायला गेलात तर त्यांचा खर्च ही तुम्हालाच करावा लागेल.

- Advertisement -

पार्टनर भाड्याने घेण्यासाठी सुद्धा काही अटींचे पालन करावे लागते. यामध्ये एखादा व्यक्ती पार्टनरशी थेट संपर्क करु शकत नाही. ही अडल्ट सर्विस नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पार्टनरला महागडे गिफ्ट ही तुम्ही देऊ शकत नाही.तर तरुणींच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु असते.

दरम्यान, भारतात सुद्धा पार्टनर ऑन रेंटचा ट्रेंन्ड वाढला गेला आहे. गुरुग्राम मधील शकुल गुप्ताने ‘बॉयफ्रेंन्ड ऑन रेंट’ असा बोर्ड घेऊन जाहिरात केली होती. तेव्हा 50 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक आणि कमेंट्स करुन आपली प्रतिक्रिया दिली होती.


हेही वाचा- मेरे सय्याजी से Breakup कर लिया…; दुःखातून सावरण्यासाठी ‘या’ आहेत टीप्स

- Advertisment -

Manini