Monday, January 20, 2025
HomeमानिनीFashionBra & Bralette Difference : ब्रा आणि ब्रालेट मध्ये काय आहे फरक...

Bra & Bralette Difference : ब्रा आणि ब्रालेट मध्ये काय आहे फरक ?

Subscribe

अभिनेत्री अनन्या पांडे हिने हल्लीच तिच्या एका वेबसीरिजमध्ये बॅलेंसियागा शर्टला एक फ्लोरल जारा ब्रालेट आणि एक क्विल्टेड लेदर स्कर्टसोबत पेयर केलं होतं. तिचा हा लूक प्रेक्षकांना फारच आवडला होता. फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीदेखील वेगवेगळ्या आऊटफिटसोबत ब्रालेट घालून त्यांच्या मॉडर्न लूकचं प्रदर्शन करताना दिसत आहे. आणि अनेक फॅशनप्रेमीदेखील या ट्रेंडला पसंत करताना दिसत आहेत.

खरंतर ब्रालेट हे केवळ अंतर्वस्त्र न राहता तरुण वर्गासाठी एक स्टायलिश टॉप बनला आहे. तसं पाहायला गेलं तर कॅज्यु्अल आणि ड्रेसी अशा दोन्ही लूकसाठी ही फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे.

ब्रा आणि ब्रालेटमधील फरक :

ब्रालेट हा एक हलका जाळीदार टॉप आहे. जो पारंपरिक ब्राच्या तुलनेत अधिक आरामदायक आणि कमी स्ट्रक्चर्ड असलेला असतो. याला मुख्यत्वे आरामाच्या दृष्टीकोनातून डिझाईन केलं जातं. याला असंच देखील घातलं जाऊ शकतं किंवा एखाद्या लेयर्ड जॅकेटसोबतही तुम्ही हे परिधान करू शकता.

ब्रा ही अधिक स्ट्रक्चर्ड आणि योग्य सपोर्ट देणारी असते. याविरुद्ध ब्रामध्ये हलका सपोर्ट असतो. ब्रा ही स्तनांना आधार देण्यासाठी वापरली जाते. तर ब्रालेट केवळ एक असा क्रॉप टॉप असतो जो विना वायर किंवा विना पॅडेड असू शकतो ज्याला तुम्ही रात्रीच्या वेळी साधा स्लिपवेअर म्हणूनही वापरू शकता.

ब्रालेट बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर ब्रालेट हे अनकन्वेशनल मटेरियलपासून बनवण्यात येते.

ब्रा बनवताना त्यात तारेचा वापर केला जातो. तर ब्रालेटमध्ये तार नसते. ब्रालेटमध्ये वेगवेगळे कट्स आणि डिझाईन्स असतात.

ब्राचा वापर हा अंतर्वस्त्र म्हणून केला जातो तर ब्रालेट हे स्टायलिश आणि स्मार्ट दिसण्यासाठी वापरलं जातं. ब्रालेटला क्रॉप टॉपप्रमाणे परिधान केलं जातं. ब्रालेट ही अनेकदा आरामदायक व सैलसर असते. कारण यात पॅडिंग, वायर किंवा टाईट कपड्याचा वापर केलेला नसतो. ब्रालेट्स अनेक प्रकारच्या टेक्स्चरमध्ये उपलब्ध असतात. ते मोकळेपणाने परिधान केले जाऊ शकतात. फंकी प्रिंटमध्येदेखील हे उपलब्ध होतात.

Bra & Bralette Difference: What is the difference between bra and bralette?
Bralette designs (Image Source : Social Media)

ब्रालेट कसे परिधान करावे ?

हाय वेस्ट स्कर्टसोबत स्टायलिश लूक हवा असल्यास तुम्ही ब्रालेट परिधान करू शकता. फ्री फ्लो स्कर्टसोबत पांढरी लेस असलेली ब्रालेट आऊटिंगसाठी बेस्ट ऑप्शन असू शकते. चांगल्या आणि आकर्षक आऊटफिटसाठी योग्य रंगसंगती असलेले स्कर्टस आणि ब्रालेट निवडा.

ब्रालेट आणि जीन्स हा एक क्लासिक कॅज्युअल कॉम्बो आहे. ट्रेंडी लूकसाठी हायवेस्ट जीन्ससोबत फिटेड ब्रालेट देखील ट्राय करू शकता. ब्लॅक ब्रालेट ब्लू जीन्ससोबत परिधान करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

पारंपरिक साडीवरदेखील ब्लाऊजच्या जागेवर तुम्ही मॉडर्न लूकसाठी ब्रालेट परिधान करू शकता.

ब्रालेटची अशी घ्या काळजी :

ब्रालेटला 2 किंवा 3 वेळा घातल्यानंतर धुणे ठीक असते पण तुम्हाला जास्त घाम येत असेल तर एकदा धुतल्यानंतर तुम्ही याला लगेचच धुवून टाका.

हेही वाचा : Clove Benefits : मसाल्यातील हा पदार्थ केसांसाठी फायदेशीर


Edited By – Tanvi Gundaye

 

 

 

 

Manini