ज्याप्रकारे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. अगदी तसेच मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी ब्रेन एक्सरसाइज करणेही गरजेचे आहे. अशा अनेक सवयी आहेत ज्या मेंदू तल्लख करण्याचे काम करतात. यामुळे स्मरणशक्तीदेखील सुधारते व विसरण्याची सवय निघून जाते. अशा सवयींनाच ब्रेन एक्सरसाइज म्हटलं जातं.
ब्रेन पॉवर वाढवणाऱ्या सवयी :
स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवा :
दररोज व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते. यामुळे बुद्धी तल्लख होते. तुम्ही व्यायामामध्ये चालणे, डान्स करणे, गार्डनिंग किंवा पोहणे इत्यादी प्रकार करू शकता. दररोज जुंबासारखे डान्स केल्यानेही शरीर अॅक्टिव्ह राहते. यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दोन्ही चांगले राहते.
झोप पूर्ण करा :
अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. अशात कमी झोपेमुळे ब्रेन डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच झोप पूर्ण झाल्यास मेंदूचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते.
मेंदूशी संबंधित खेळ खेळावे :
असे अनेक खेळ आहेत जे खेळल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही पझल्स, सुडोकू ,चेस यांसारखे खेळ खेळू शकता. याव्यतिरिक्त ऑनलाईन खेळही तुम्ही खेळू शकता. याप्रकारचे खेळ डोक्याला चालना देतात. आणि बुद्धी तल्लख करण्यास मदत करतात.
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या :
पोषकतत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात प्रोटिन्स, व्हिटामिन्स, ओमेगा -3 आणि खनिजांनी युक्त पदार्थांचा समावेश करा. याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फूडसचे सेवन करणे टाळावे. प्रोसेस्ड फूडस मेंदूला नकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात.
वजन नियंत्रित ठेवा :
जेव्हा व्यक्तीचं वजन वाढू लागतं तेव्हा त्याचा केवळ शरीरावरच नव्हे तर मनावरही परिणाम होत असतो. वजन वाढल्यावर ओव्हरथिंकिंग करण्याचे प्रमाणही वाढते. आणि डोक्यात नकारात्मक विचार येऊ लागतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. यामुळेच वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Health Tips : या व्यक्तींसाठी हिवाळ्यात कोमट पाणी पिणे ठरू शकते नुकसानदायक
Edited By – Tanvi Gundaye