Monday, December 30, 2024
HomeमानिनीHealthBrain Rot disease : तासन् तास रील्स पाहिल्याने वाढतो ब्रेन रॉटचा...

Brain Rot disease : तासन् तास रील्स पाहिल्याने वाढतो ब्रेन रॉटचा धोका

Subscribe

आजच्या व्यस्त जीवनात आपण सर्वच जण आपल्या मेंदूवर भार टाकतो. सोशल मीडिया, स्मार्टफोन्स आणि माहितीचा सततचा महापूर आपल्या मनाला कंटाळतो. या स्थितीला अनेकदा “ब्रेन रॉट” म्हणतात. अलीकडेच ऑक्सफर्डनेही ‘ब्रेन रॉट’ला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे.
तेव्हापासून तो अधिकच चर्चेत आला आहे. ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते.
आपली एकाग्रता कमी होते. आणि आपल्याला खूप तणाव जाणवू लागतो. ही समस्या Gen-Z पिढीमध्ये झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय. त्यामुळे अशा काही टिप्स वापरून पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे मेंदू निरोगी राहू शकतो आणि ब्रेन रॉट टाळण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊयात अशा काही टिप्सविषयी.

मेंदू कुजण्याची अर्थात ब्रेन रॉटची लक्षणे :

एकाग्रतेचा अभाव
स्मरणशक्ती कमी होणे
चिंता आणि तणाव
निद्रानाश
मूड बदलणे
सर्जनशीलतेचा अभाव
निर्णय घेण्यात अडचण

- Advertisement -

आपण ब्रेन रॉट कसा टाळू शकतो?

डिजिटल डिटॉक्स :

दररोज काही काळ फोन आणि सोशल मीडियापासून दूर राहा.
नोटिफिकेशन बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा.

- Advertisement -

भरपूर झोप घ्या :

पूर्ण झोप घेतल्याने मेंदू रिचार्ज होतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटू लागते.
दररोज 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
पुरेशा झोपेमुळे मेंदू अधिक चांगल्या प्रकारे माहिती साठवू शकतो, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

Brain Rot disease: Watching reels for hours increases the risk of brain rot

ध्यान आणि योगा :

ध्यान आणि योगा केल्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते .
ध्यान आणि योगासने नियमित करा.

शारीरिक हालचाली :

व्यायाम केल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि तणाव कमी होतो.
दररोज 30 मिनिटे व्यायाम करा.

निरोगी आहार घ्या :

फळे, भाज्या, सुका मेवा खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो.
प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड खाणे टाळा.

नवीन गोष्टी शिका :

नवीन गोष्टी शिकल्याने मन सक्रिय राहते .
एक नवीन अभ्यासक्रम शिकण्याचा प्रयत्न करा, नवीन भाषा शिका किंवा नवीन छंद विकसित करा.

सामाजिक संबंध :

मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा.
सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा.

ताणाचे व्यवस्थापन :

ताण कमी करण्यासाठी विविध तंत्रे वापरा, जसे की खोल श्वास घेणे, संगीत ऐकणे किंवा मसाज करणे.

एका वेळी एक गोष्ट करा :

मल्टीटास्किंग टाळा.
एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.

निसर्गाच्या जवळ रहा :

निसर्गात वेळ घालवल्याने तणाव कमी होतो आणि सर्जनशीलता वाढते.

ब्रेन रॉट टाळण्यासाठी काही इतर मार्ग :

भरपूर पाणी प्या.
नियमित ब्रेक घ्या.
सर्जनशील विचार करत राहा.
मजेमजेत, गप्पागोष्टी करत काम करा.
आपल्या मर्यादा जाणून घ्या आणि त्यांचा स्वीकार करा.

हेही वाचा : Dry eyelashes : थंडीमुळे कोरड्या पडलेल्या पापण्यांना असे करा मॉईश्चरायझ


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini