सकाळच्या धावपळीत जर तुम्हाला तुमच्या सकाळच्या टिफिनसाठी काय बनवायचे हे ठरवता येत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी 7 आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही लवकर तयार करू शकता आणि या रेसिपी टिफिनसाठी देखील सर्वोत्तम आहेत.
ओट्स उपमा

ओट्स उपमा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. ओट्स उपमा बनवण्यासाठी, कांदा, गाजर, टोमॅटो, मसूर यासारख्या भाज्या सोलून घ्या आणि त्यांना मसाल्यांमध्ये शिजवून घ्या. त्यात फायबरयुक्त ओट्सचा रवा घाला , आता पाणी घाला आणि शिजवा. एकदा शिजले की टिफिनमध्ये पॅक करा.
क्विनोआ सॅलड

क्विनोआ सॅलड केवळ पोटासाठी हलके नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले आहे. क्विनोआ सॅलड करण्यासाठी, प्रथम क्विनोआ उकळवा.क्विनोआ हे ग्लूटेन मुक्त धान्य आहे. क्विनोआ हे शेतात घेतले जाणारे पीक आहे आणि त्याच्या बियांचा वापर अन्नासाठी केला जातो. आता त्यात टोमॅटो, काकडी आणि इतर भाज्या घाला आणि थोडे मीठ घाला व चांगले मिसळा. तयार केलेले क्विनोआ सॅलड हा टिफिनसाठी एक निरोगी पर्याय आहे. हायपरथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तींसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
व्हेजिटेबल उपमा

व्हेजिटेबल उपमामध्ये खनिजे, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे बनवायला सोपे आहे, खायला चविष्ट आहे आणि पचण्यासाठी खूप हलके आहे. कांदा, टोमॅटो, बीन्स, गाजर आणि वाटाणे यासारख्या भाज्या तेलात मसाल्यांसह हलके परतून घ्या. आता त्यात रवा घाला. थोडेसे परतून घ्या आणि पाणी घालून शिजवा. टिफिनसाठी हा एक हेल्दी पर्याय आहे.
पनीरसोबत हरा भरा कबाब

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी पनीरसोबत हरा भरा कबाब हा एक चांगला पर्याय आहे. हे करण्यासाठी, चिरलेली सिमला मिरची आणि पालक मिक्सरमध्ये दोन चमचे तेल घालून बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर त्यात मीठ, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची आणि खसखस घाला. मिश्रणाच्या आतील भागात पनीर भरा आणि नंतर पॅनमध्ये ते शॅलो फ्राय करा.
मूग डाळीचे सॅलड

यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. मूग डाळ सॅलड शरीरातील कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे एक चविष्ट आणि पौष्टिक अन्न आहे. ते बनवण्यासाठी भिजवलेली आणि कुस्करलेली हिरवी मूग डाळ आणि मसाले वापरले जातात. मूगात असलेल्या हाय प्रोटिन्समुळे हा नाश्ता तुमच्यासाठी हेल्दी असण्यासोबतच भरपेटही असू शकतो.
ब्रेड बेसन टोस्ट

जर तुम्हाला सकाळी घाई असेल आणि खूप दूर जायचे असेल तर ब्रेड बेसन टोस्ट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ते कुरकुरीत, मसालेदार आणि भाज्यांनी भरलेले असते. हे बनवण्यासाठी बेसनाचे पीठ बनवले जाते आणि ताजा ब्रेड मधून कापला जातो. त्यात भाजी भरली जाते व एकदा ती कुरकुरीत झाली की तुम्ही ती तुमच्या टिफिनमध्ये पॅक करू शकता आणि सोबत घेऊन जाऊ शकता.
ब्रेड रोल

सकाळी लवकर पोट भरण्यासाठी कॅलरीज युक्त ब्रेड रोल हा एक चांगला पर्याय आहे. हे करण्यासाठी, कांदा बारीक चिरून घ्या आणि 3 चमचे तेलात गरम करा. यानंतर, कांद्यामध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट घाला, ते मिक्स करा. स्वीट कॉर्न आणि वाटाणे घाला आणि ते परतून घ्या. हे स्टफिंग ब्रेडमध्ये भरून त्याचे रोल तयार करा व तेलात तळून घ्या. चविष्ट आणि मसालेदार, पोटभर नाश्ता म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा : Bachendri Pal : माउंट एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला
Edited By – Tanvi Gundaye