तुमच्यापैकी बहुतांश लोकांची सकाळ ही धावपळीची, गोंधळाची असते. अशातच सकाळचा नाश्ता ही स्किप केला जातो. खरंतर सकाळचा नाश्ता स्किप केल्याने काही होत नाही असे म्हणणारे खुप लोक आहेत. परंतु याचा परिणाम आरोग्यावर नकारात्मक होतो हे माहितेय का. नाश्ता स्किप केल्याने तुम्हाला संपूर्ण दिवस क्रेविंग होत राहतो आणि तुम्ही अधिक प्रमाणात पदार्थांचे सेवन केले तरीही पोट भरल्यासारखे तुम्हाला वाटत नाही. असे करणे अनहेल्दी आरोग्याचे लक्षण मानले जाते.
मात्र जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि सकाळचा नाश्ता स्किप करत असाल तर असे करू नका. तुमची क्रेविंग्स वाढून वजन उलट वाढले जाईल. आपण जे फूड्स खातो त्याबद्दल नेहमीच काळजी घेतली पाहिजे. वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणे खरंच गरजेचे आहे का? या बद्दल एक्सपर्ट्स काय म्हणतात हे पाहूयात.
-क्रेविंग्स कंट्रोल करण्यास मदत
जी लोक रिकाम्या पोटी राहतात किंवा नाश्ता करत नाही त्यांच्यामध्ये रात्रीच्या वेळ खुप जेवण जेवण्याची इच्छा होते. या स्थितीत तुम्ही पिज्जा, पास्ता अथवा कोणतेही अनहेल्दी फूड खाता. अशातच तुम्ही ज्या कॅलरीजसाठी नाश्ता स्किप करता त्यामुळे कॅलरी इंटेक रात्रीच्या वेळी अधिक वाढला जातो. त्यामुळे सकाळचा हेल्दी नाश्ता तुम्ही केला पाहिजे.
-संध्याकाळ आणि सकाळच्या कॅलरीज बॅलेन्स करा
बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता स्किप करण्यासाठी तुम्ही नाश्ता स्किप करत असाल आणि संध्याकाळी, दुपारी अधिक प्रमाणात जेवत असाल तर याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. अशातच आपल्या संपूर्ण दिवसाची सुरुवाच हेल्दी आणि संतुलित पदार्थांनी करावी.
-ब्लड शुगर नियंत्रित ठेवावे
सकाळी नाश्ता केल्याने तुमच्या शरिरात उर्जेचा स्तर वाढला जातो. त्याचसोबत ग्लूकोज किंवा ब्लड शुगरची पुर्तता पूर्ण होते. संपूर्ण दिवस ग्लूकोजच्या चढ-उतारापासून बचाव करण्यासाठी दोन तासांमध्ये फळं, कडधान्ये आणि लीन प्रोटीन खावेत. जी लोक नियमित रुपात नाश्ताक करतात त्यांच्यामध्ये नाश्ता स्किप करण्याऱ्यांचा तुलनेत मधुमेहाचा धोका अत्यंत कमी असतो.
-मेटाबॉलिज्म वाढला जातो
सकाळी ब्रेकफास्ट केल्याने मेटाबॉलिज्म वाढला जातो. खासकरुन जी लोक वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी हे अधिक प्रभावी रुपात कार्य करतो. अॅक्टिव्ह आणि हेल्दी मेटाबॉलिज्म अधिक प्रमाणाकत कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. तर ब्रेकफास्ट स्किप केल्याने तुमचे शरिर मेटाबॉलिज्म कॅलरीज बर्न करण्याऐवजी ती रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते.
हेही वाचा- 15 दिवसात वजन होईल कमी करा ‘ही’ योगासन