Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthब्रेकफास्ट न करण्याची सवय पडू शकते भारी

ब्रेकफास्ट न करण्याची सवय पडू शकते भारी

Subscribe

ज्या लोकांना रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट न करताच घराबाहेर पडण्याची सवय महागात पडू शकते. कारण अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, जी लोक ब्रेकफास्ट करत नाहीत त्यांच्यामध्ये पोट आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोका असतो.

कॅन्सर रोग विशेतज्ञ असे म्हणतात की, जी लोक दररोज रात्री उशिरापर्यंत जागतात, उशिरा खातात किंवा नेहमीच पार्टी करत राहतात, दारू पितात, सकाळी नाश्ता करत नाहीत त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका असतो. कॅन्सर सुद्धा लाइफस्टाइलच्या हिस्स्यातील एक आजार आहे. जी लोक हेल्दी लाइफस्टाइल जगतात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका कमी असतो.

- Advertisement -
breakfast rules

त्याचसोबत ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असते त्यांनी सकाळी उठून बडीशोप, जीर आणि आल्याचे पाणी प्यायले पाहिजे. त्यानंतर ब्रेकफास्ट करावा. जसे की, इडली, डोसा, पोहा असे काही.

मात्र ज्यांना अॅसिडिक प्रॉब्लेम आहे त्यांनी दही, दूध किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाऊ नयेत. तळलेले पदार्थ ही खाणे टाळा. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत लंच करा. तर सुर्यास्तानंतर आपली पचनक्रिया मंदावली जाते त्यामुळे रात्री हलका आहार घ्यावा.

- Advertisement -

हेही वाचा- शरीरातील Good Cholesterol कमी होऊ देत नाहीत ‘हे’ फूड्स

- Advertisment -

Manini