प्रेग्नेंसी ते बाळाला दूध पाजण्यापर्यंतच्या काही गोष्टींबद्दल एका महिलेच्या मनात विविध प्रश्न असतात. जो पर्यंत बाळ पोटात असते तो पर्यंत आईला आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. तर डिलिवरीनंतर काही वर्षे तरी बाळाला ब्रेस्टफिडींग करावी लागते. त्यामुळे आईला आपल्या शारिरीक पोषणाकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते.
आईचे दूध अमृतासमान वाटते. सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत बाळाच्या विकासासाठी त्याला आईवर निर्भर रहावे लागते. आईच्या दूधातून त्याला सर्व पोषक तत्त्वे मिळतात. जे शारिरीक विकासासाठी गरजेची असतात. त्यामुळे आईने सुद्धा आपल्या डाएटमध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक असते. अशातच ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या मॉमचा कसा असावा डाएट याचबद्दल जाणून घेऊयात.
ब्रेस्टफिडींग मॉमसाठी असा असावा डाएट
-ब्रेस्टफिडींग करणाऱ्या मॉमने कमीत कमी वेळा आपल्या डाएटमध्ये प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा.
-ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनी हिरव्या पालेभाज्यांसह पिवळ्या रंगाच्या भाज्यांचा सुद्धा खाव्यात.
-कमीत कमी दिवसातून दोन वेळा मौसमी फळं जरूर खावीत.
-दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी ओटमील, ब्राउन राइस सारखी फायबरयुक्त फूड्स खावेत.
-स्तनपान करताना महिलांना खुप अधिक तहान लागते. त्यामुळे शरीराला हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभर पाणी पिण्यासह तुम्ही दुसरे हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता.
हेही वाचा- प्रेग्नेंसीत किती असावे हिमग्लोबीन?