Friday, April 26, 2024
घरमानिनीप्रेग्नेंसी दरम्यान महिलांनी ब्रेस्टफिडिंग करावे का?

प्रेग्नेंसी दरम्यान महिलांनी ब्रेस्टफिडिंग करावे का?

Subscribe

प्रेग्नेंसीचा काळ हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अगदी नाजूक आणि आनंदाचा काळ असतो. या दरम्यान त्यांना काही गोष्टी खाण्यापिण्यापासून रोखले जातेच. परंतु काही महिलांचे असे होते की, अंगावरचे दुध पिणारे बाळ असेल तरीही त्या प्रेग्नंट राहिल्यास अशा स्थितीत त्याला दूध द्यावे का? याचा बाळावर काय परिणाम होईल? प्रेग्नेंसीदरम्यान स्तनपान करणे खरंच सुरक्षित आहे का असे विविध प्रश्न पडतात. याच प्रश्नांची आपण येथे उत्तर जाणून घेऊयात.

तुमच्या लहान मुलाला अंगावरचे दुध पाजत असलात तरीही महिला या प्रेग्नेंट होऊ शकतात. काही प्रकरणी असे पाहिले गेले आहे. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. खरंतर प्रेग्नेंसी दरम्यान ब्रेस्टफिडिंग करणे अगदी सुरक्षित मानले जाते.

- Advertisement -

डॉक्टर असे सांगतात की, महिलांच्या दूधात यामुळे कोणतीही कमतरता होत नाही. म्हणजेच प्रग्नेंसी संदर्भात त्या ब्रेस्टफिडिंग करु शकतात आणि याचा धोका गर्भात असलेल्या बाळाला सुद्धा होत नाही. परंतु डॉक्टर तुम्हाला बाळाला अंगावरचे दुध देणे थांबवू नका असे सांगत नाही तो पर्यंत तुम्ही दूध पाजू शकता.

ब्रेस्टफिडिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल
-प्रेग्नेंसी दरम्यान ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांना दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तुमचे खाणपिणं कसे आहे याकडे लक्ष द्यावे लागते. महिलांनी आपल्या डाएटमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि लोहयुक्त गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन करावे.
-प्रेग्नेंसी दरम्यान शरिरात रक्ताची कमतरता भासू नये म्हणून डाएटमध्ये डाळिंब, ड्राय फ्रुट्स आणि रेड मीट सारख्या गोष्टींचा समावेश करु शकता.
-प्रेग्नेंसीदरम्यान महिलांच्या शरिरात काही प्रकारचे हार्मोनल बदल होतात. त्यामुळे अशा वेळी ब्रेस्टफिडिंग करण्यापूर्वी ब्रेस्टला ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या.

- Advertisement -

 


हेही वाचा : ऑफिसच्या कामांमुळे मुलांकडे लक्ष देता येत नसेल तर ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini