Monday, January 20, 2025
HomeमानिनीCleaning Tips : काळी पडलेली सिल्वर ज्वेलरी अशी करा चकाचक

Cleaning Tips : काळी पडलेली सिल्वर ज्वेलरी अशी करा चकाचक

Subscribe

आपलं आउटफिट हे ज्वेलरीशिवाय अपूर्ण आहे. ज्वेलरी हा आपल्या आउटफिटचा अविभाज्य भाग आहे. आपण आपल्या कपड्यांपासून ते मेकअप पर्यत सर्व गोष्टींची काळजी घेतो. बऱ्याचदा आपण ज्वेलरी वापरून झाली की, ती तशीच बाजूला ठेवतो. त्यामुळे ज्वेलरी काळी पडते. विशेषत: सिल्वर ज्वेलरी आपण कितीही प्रयत्न केलं तरी काळेपणा जात नाही. आज आपण जाणून घेऊयात, काळी पडलेली सिल्वर ज्वेलरी कशी चकाचक करायची

बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण

बेकिंग सोड्याचा वापर चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी देखील केला जातो. बेकिंग सोडा पाण्यात चांगले मिसळून पेस्ट बनवा आणि 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि मीठ

चांदीचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ लावू शकता. एका भांड्यात मीठ घ्या, त्यात लिंबू पिळून मिक्स करा. आता दागिन्यांवर लावा आणि 10-15 मिनिटे सोडा, नंतर कोमट पाण्याने धुवा.

व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण

चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेले व्हिनेगर देखील वापरू शकता. पाण्यात व्हिनेगर मिसळून एक छान मिश्रण तयार करा आणि त्यात तुमचे दागिने 10-15 मिनिटासाठी ठेवा , नंतर कोमट पाण्याने धुवा. काही वेळाने तुम्हाला या चांदीच्या ज्वेलरीमध्ये फरक दिसेल.

टूथपेस्ट

तुम्ही पांढरी टूथपेस्ट वापरून काळी पडलेली सिल्वर ज्वेलरी स्वच्छ करू शकता. ही टूथपेस्ट ज्वेलरीवर लावून हलक्या हाताने ब्रशने घासून घ्या. पाण्याने स्वच्छ धुऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्या. याने आपली सिल्वर ज्वेलरी पुन्हा चकाचक होईल.

हँड सॅनिटायझर

कोरोनाच्या काळापासून प्रत्येकाच्या घरी हँड सॅनिटायझर असते. हे चांदीच्या पॉलिशिंगसाठी देखील वापरलं जाऊ शकतं. यासाठी एका भांड्यात थोडं सॅनिटायझर घ्या. त्यात चांदीची ज्वेलरी घाला. अर्ध्या तासानंतर घासून पुन्हा सॅनिटायझरमध्ये बुडवा. काही वेळानं कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा.

हेही वाचा : Fashion Tips : साडीवर या नथी ट्राय करा


Edited By : Prachi Manjrekar

 

 

 

 

 

Manini