घरलाईफस्टाईलवांग्याचे लोणचे

वांग्याचे लोणचे

Subscribe

वांगी, व्हिनेगर आणि मसाले टाकून चटपटीत वांग्याचे लोणचे बनवून रोटी किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

साहित्य

लहान गोल वांगी – १०० ग्रॅम,लसूण -10 पाकळ्या,आले- 2 इंच ,लाल मिरच्या- 15 ,व्हिनेगर- 115 मिली,मोहरीची डाळ -5 चमचे,हळद -1 चमचा ,गूळ -125 ग्रॅम ,वेलदोडे – 6 मोठे ,दालचिनी -1 इंच,लवंगा – 4 ,मिरीचे- 10 दाणे,तेल – 6 मोठे चमचे,मोहरी – अर्धा चमचा ,मीठ -5 चमचे

- Advertisement -
पाककृती

*आले-लसूण बारीक वाटून घ्यावे.

*लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.

- Advertisement -

*गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा.

*वांगी धुवून पुसून ठेवावी आणि त्याचे 2 सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.

*कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.

*त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून सोडावे. वांगी मंदाग्नीवर शिजू द्यावीत.

*एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी.

*वांगी मधूनच एक-दोनदा झार्‍याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे.

*दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्यादीची पूड घालावी.

*मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे.

*नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. मात्र हे लोणचे आठ-दहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -