हल्ली सोलो ट्रिपचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांसह आता महिलाही पर्यटनासाठी सोलो ट्रिपचा प्लॅन करतात. पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला जातो. आता हिवाळा संपत आला असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. अशावेळी फिरण्यासाठी हिल स्टेशन निवडले जातात. पण, आपण फिरण्यासाठी निवडलेले हिल स्टेशन महिलांच्यादृष्टीने किती सुरक्षित आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. हा नियम केवळ महिलांबाबत लागू होतो असे नाही तर कपल्सने याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही महिला पर्यटकासाठी आणि कपल्ससाठी देशातील असे कोणते हिल स्टेशन आहेत जे फिरण्यासह सुरक्षितही सांगितले जातात, हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात, फिरण्यासाठी बेस्ट आणि सुरक्षित हिल स्टेशन
धर्मशाला (Dharamshala)
महिलांना एकट्या ट्रॅव्हल करण्यासाठी आणि कपल्ससाठी बेस्ट मानल्या जाणाऱ्या हिल स्टेशनपैंकी एक म्हणजे धर्मशाला. हिमाचलमध्ये हे हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला ढगांनी झाकलेल्या उंच पर्वतांमध्ये, घनदाट जंगलांमध्ये, तलावांजवळ आणि धबधब्यांजवळ पार्टनरसोबत रोमॅंटिक क्षण घालवता येतील. यासह येथे त्रिउंड हिल, दाल लेक, करेरी लेक एक्सप्लोर करता येतील.
डलहौसी (Dalhousie)
समुद्रसपाटीपासून 6 हजार उंचीवर असलेले डलहौसी हे सर्वात सुंदर आणि रोमॅंटिक हिलपैंकी एक आहे. डलहौसी हे हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्हाला चमेरा तलाव, पंचपुल्ला, बक्रोटा हिल्सचा आनंद घेता येईल.
मसुरी (Mussoorie)
उत्तराखंड येथे जाण्याचा विचार करत असाल तर मसुरी बेस्ट आणि सुरक्षित हिल स्टेशन आहे. मसुरीला टेकड्यांची राणी असे म्हणतात. मसुरीमध्ये तुम्ही मॉल रोड, कंपनी गार्डन, केम्प्टी फॉल्स, नौ व्हू पॉइंटसारखी सुंदर ठिकाणे पाहता येतील, जी महिलांसाठी सुरक्षित सांगितली जातात.
मुन्नार (Munnar)
फिरण्यासाठी बेस्ट आणि सुरक्षित हिल स्टेशन म्हणजे मुन्नार आहे. सोलो ट्रिपसाठी तुम्ही या ठिकाणाची निवड करू शकता. मुन्नारमध्ये अट्टक्कड धबधबे, चहाचे मळे, बोटॅनिकल गार्डन सारखी ठिकाणे पाहता येतील.
याशिवाय सोलो ट्रिपसाठी आणि कपल्ससाठी ईशान्य भारतातील गुलमर्ग ते नैनिताल, वायनाड ते कुर्ग आणि गंगटोकपर्यत सुरक्षित ठिकाणे सांगितली जातात.
हेही पाहा –