गुलाबी थंडीत फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. थंड हवामान, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अनेक फॅमिली पिकनिकचे बेत आखले जातात. पिकनिक म्हटले की, खर्च आलाच. ज्यामुळे अनेकजण पिकनिकचा बेत कॅन्सल करतात. पण, आज आम्ही तुम्हाला फॅमिली ट्रिपसाठी बजेटमध्ये असणारी काही ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला गुलाबी थंडीसह, पर्वतरांगा, धबधबे या सर्वाचा आनंद घेता येईल.
औली –
उत्तराखंडमधील औली ठिकाण हिवाळ्यात फॅमिली पिकनिकसाठी बेस्ट असेल. औलीमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने येथे गेल्यावर तुम्हाला स्वर्गात गेल्याची अनुभूती येते.
कुर्ग –
कर्नाटकातील कुर्ग हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला घनदाट जंगलासह सुंदर धबधबे पाहता येतील.
वायनाड –
केरळमधील वायनाड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे विविध थीम पार्क, अभयारण्य, धबधबा असल्याने लहान मुलांना फिरायला घेऊन जाण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.
गोवा –
हिवाळ्यात फिरण्यासाठी गोवा बेस्ट ठिकाण आहे. येथे फॅमिली, मित्र-मंडळी आणि पार्टनरसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता.
राजस्थान –
राजस्थानला पिंक सिटी म्हटले जाते. येथे थंडीच्या वातावरणात हवा महल, नाहरगड किल्ला, आमेर किल्ला अशा ठिकाणांना भेट देता येईल.
महाराष्ट्रात फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे –
- मुंबईपासून केवळ 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेले लोणावळा ठिकाण फॅमिली पिकनिकसाठी परफेक्ट असेल.
- तुम्ही अलिबागला जाऊ शकता. येथे समुद्रकिनारा असल्याने थंडीसह पाण्याची मज्जा तुम्हाला घेता येईल.
- पाचगणी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. भव्य टेकड्यांनी वेढलेले हे शहर खिशाला परवडणारे सुद्धा आहे.
- सातपुडा पर्वतरांगात वसलेले चिखलदरा थंड हवेचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.
- कोल्हापुरातील गगनबावडा ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
- इगतपुरी हे पश्चिम घाटात वसलेले हिल स्टेशन आहे. येथील पर्वत रांगामध्ये उंच टेकड्यांचा आनंद घेता येईल.
- तुम्ही गणपतीपुळ्याला देखील जाऊ शकता. हे ठिकाण शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
- फॅमिली पिकनिकसाठी मुरुड बीचचा ऑपश्न बेस्ट असेल. येथील समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन पाहता येतील. याशिवाय पॅरासेलिंग, उंटाची सवारी, वॉटर स्कूटर राइड यासारख्या ऍक्टिव्हीटीचा आनंद घेता येईल.
हेही पाहा –