आपलं घर आकर्षक आणि सुंदर दिसावं असं सर्वांना वाटत असत. होम डेकोरने आपल्या घराला एक सुंदर लूक मिळताे. बऱ्याच लोकांना असे वाटते हाेम डेकाेर करणे हे खूप खर्चिक ठरू शकते. परंतु तुम्ही काही क्रिएटिव्ह कल्पनांचा वापर करून कमी खर्चातही घराला सुंदर आणि स्टायलिश लूक देऊ शकता. काही साध्या बदलांमुळे तुमच्या घराचा लूक पूर्णपणे बदलू शकतो. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात बजेट फ्रेंडली हाेम डेकाेर कसं करायचं.
जुन्या वस्तूंनी सजवा घर
जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून तुम्ही घर सजवू शकता. जसे की बॉटल आर्ट, टायरचा स्टूल रंगीत पेपर, दोरखंड, आणि जुने पोस्टर्स वापरून वॉल आर्ट तयार करू शकता जुन्या साड्यांपासून कुशन कव्हर किंवा पडदे तयार करा.
वॉल डेकोरेशन
भिंतींवर वॉशेबल स्टिकर्स किंवा वॉलपेपर वापरा. जुन्या फोटोंचा कोलाज तयार करा. हस्तकला किंवा वॉटरकलर पेंटिंग करून लावू शकता किंवा तुम्ही वॉल सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी स्प्र्ये पैंटिंग्स करू शकता.
लाइटिंग बदलून लूक द्या
तुम्हाला घराला नवीन लूक द्याचा असेल तर LED दिवे किंवा फेरीलाइट्स लावून घराला आकर्षक लूक देऊ शकता. जुन्या काचेच्या बरण्या किंवा बाटल्यांमध्ये दिवे टाकून सुंदर लॅम्प तयार करा.
घरगुती प्लांट्स
तुम्ही घरी सुंदर प्लांट्स लावू शकता. मनी प्लांट, स्नेक प्लांट, अरेका पाम हे कमी खर्चिक आणि सुंदर पर्याय आहेत. जुन्या डब्यांमध्ये रोपं लावून नैसर्गिक लुक मिळवा.
फ्लोअरिंग बदल
कमी खर्चिक रग्ज आणि कार्पेट्स वापरून फर्श आकर्षक बनवा. जुन्या टाइल्सवर स्टिकर वापरून नवीन लुक द्या.
सुगंधी मेणबत्त्या आणि डिफ्यूझर्स
कमी खर्चात घराला आलिशान आणि फ्रेश लुक मिळवण्यासाठी सुगंधी मेणबत्त्या किंवा हर्बल डिफ्यूझर्स वापरू शकता.
टिप्स
- कमी खर्चात आणि क्रिएटिव्ह कल्पना वापरून घर सुंदर आणि आकर्षक बनवू शकता.
- योग्य रंगसंगती, प्रकाशयोजना आणि लहानशी सजावटदेखील घराचा लूक पूर्णपणे बदलू शकते.
हेही वाचा : Pet Home Decor : पाळीव प्राण्यांसाठी बेस्ट होम डिझाइन्स
Edited By : Prachi Manjrekar