निसर्गप्रेमी व्यक्ती फिरण्यासाठी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकते. निसर्गाच्या सानिध्यात राहील्याने मन आणि शरीर दोन्ही शांत होतात. रोजच्या ताणतणावामुळे थोडं रिलॅक्स होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात सहल काढली जाते. आपल्या देशात अशी ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही बजेटमध्ये फिरून येवू शकता, त्यापैंकी एक आहे आसाम. आसाम हे देशातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. आसामला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. मंदिराशिवाय येथे तुम्हाला हिरवीगार डोंगर-दऱ्या पाहता येतील. तुम्हीही जर आसामला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला आसाममधील अशी काही ठिकाणे सांगणार आहोत, जिथे तुम्ही जायलाच हवे.
हाजो –
हाजो हे ठिकाण आसाममधील कामरुप जिल्ह्यातील आहे. येथे गेल्यावर तुम्हाला निसर्गाची खरी ओळख होईल. याशिवाय येथे अनेक मंदिरे सुद्धा पाहता येतील.
श्री सूर्य पहार –
आसाममध्ये फिरायला गेलात तर अवश्य पाहा. येथील आणखी खासियत सांगायची झाल्यास शिवलिंग, स्तूप आणि देवतांच्या विविध मूर्ती पाहता येतील. श्री सूर्य पहार स्टेशन गोलपारा जिल्ह्यापासून जवळपास 12 किमीच्या अतंरावर आहे. फॅमिली पिकनिकसाठी हे ठिकाण परफेक्ट राहिल.
नामेरी राष्ट्रीय उद्यान –
पक्षी- प्राण्यांची आवड असेल तर नामेरी नॅशनल पार्कला अवश्य भेट द्यावी. येथे तुम्हाला विविध पक्षांसोबत हत्ती, वाघ, बिबट्या बघता येतील. एकूणच जंगल सफारीचा आनंद घेता येईल. मुलांसोबत आसाम फिरण्याचा प्लॅन असेल तर अवश्य या ठिकाणी जायला हवे.
हेही पाहा –