घरलाईफस्टाईलबजेटमध्ये लग्न करायचयं? मग ह्या टीप्स वापरा

बजेटमध्ये लग्न करायचयं? मग ह्या टीप्स वापरा

Subscribe

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. यामुळे हा स्पेशल दिवस अविस्मरणिय राहावा यासाठी प्रत्येक कपल लग्नात वेगवेगळे थीम ठेवत असतात. मग त्यासाठी बऱ्याचवेळा अनावश्यक खर्चही केला जातो. यात अनेकजण कर्ज काढून लग्नसोहळे करतात. पण नंतर हे कर्ज फेडता फेडता अनेकजण मेटाकुटीस येतात. पण हे टाळताही येऊ शकते. त्यासाठी दोघा वधू वरांनी सामंजस्याने लग्नाचे बजेट आखावे. जेणेकरुन पैशांची बचत तर होईलच शिवाय तो पैसा दोघांना भविष्यात इतर महत्वाच्या कामांसाठी वापरता येईल.

- Advertisement -

लग्नाच्या हॉलची निवड आणि बुकींग

दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. हे दिवस थंडीचे असल्याने हिवाळ्यात लग्न करताना शक्यतो गार्डन, लॉन निवडू नये. त्याऐवजी हॉलचा पर्याय निवडावा. गार्डन , हॉलची किंमत ही हॉलच्या तुलनेत कमी असते. तसेच सध्या कोरोनाकाळात लग्नास उपस्थित राहणाऱ्यांची संख्याही कमी असल्याने उगाचच मोठ्या पर्यायाची निवड करू नये.

- Advertisement -

तसेच लग्नाच्या चार पाच महिन्याआधीच हॉलचे बुकींग करावे. त्यावेळी हॉलचे रेटही कमी असतात. ऐनवेळी धावाधाव करणेही टाळता येते.

लेहंगा, शेरवानी भाड्याने घेणे

सध्या लग्नात लेहंगा आणि शेरवानी महागडे सूट घालण्याचा ट्रेंड आहे. हे लेहंगे आणि शेरवानी महाग तर असतातच शिवाय वन टाईम वेअर असतात. म्हणजेच एकदा लग्नात वापरलेला लेहंगा पुन्हा बरेचजण घालत नाहीत. यामुळे त्यासाठी खर्च केलेले हजारो लाखो रुपयेही वाया जातात. यामुळे जर तुम्हांला बजेटमध्ये लग्न करायचे असेल तर या नाहक खर्चाला आधी कात्री लावणे आवश्यक आहे.
यासाठी हल्ली चित्रपट, मालिकांमध्ये जे लेहंगे , साड्या कलाकार घालतात ते ही भाड्यानेच घेतलेले असतात. तोच फंडा तुम्हीही तुमच्या लग्नात वापरू शकता. मुंबईत अशी बरेच बुटीक्स किंवा दुकाने अाहेत जिथे लग्न पार्टीसाठी भाड्याने कपडे मिळतात.ज्यामुळे सणही साजरा होतो आणि कमी खर्चात महागडे कपडे घालण्याची हौसही भागते.

भाडयाचे दागिणे
कपड्यांप्रमाणेच तुम्ही महागडे ज्वेलरी देखील भाड्याने घेऊ शकता. यामुळे आर्टीफिशियल दागिन्यांवरचा भरमसाठ खर्च वाचवता येतो.

वेडींग प्लानरची मदत

सध्याच्या काळात नवरा मुलगा मुलगी दोगेही नोकरी करणारे असतात. यामुळे लग्नाच्या बारीकसारीक कामासाठी त्यांना वेळ मिळत नाही. यासाठी वेडींग प्लानरची मदत घ्यावी. वेडींग प्लानरला तुमचा बजेट सांगावा. त्यामुळे तो तुम्हांला बजेटमधल्या लग्नात मदत करू शकतो.

स्वत:चे मेकअप किट

लग्नात नवरीला , नवऱ्याला मेकअप करण्यासाठी ब्युटीशियन किंवा मेकअप आर्टीस्टला बोलावले जाते. हे मेकअप आर्टीस्ट तुम्हाला मेकअप करताना स्वतचे सामान वापरतात. त्यासाठी ते भरमसाठ पैसे आकारतात. पण जर तुम्ही तुमचा मेकअप किट जवळ ठेवला तर तुमचे बरेच पैसे वाचतील.

 

जेवणातील मेन्यू

जेवणातील मेन्यू हा नेहमी ऋतू बघून ठेवावा. कारण बऱ्याचवेळा जेवणात नको तेवढे पदार्थ ठेवले जातात. जे संपतीलच असे नाही. त्यामुळे अन्न तर वाया जातेच शिवाय उगाच खर्चही वाढतो. यामुळे हल्ली बऱ्याच लग्नात ऋतूप्रमाणे मेन्यू ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे.

डिजिटल कार्ड

सध्याच्या डिजिटल काळात लग्नपत्रिका न छापता डिजिटल कार्ड बनवावे. सध्या याचाच ट्रेंड आहे. जर तुम्हांला पत्रिका छापायचीच असेल तर त्यासाठी नातेवाईकांची यादी बनवावी. जवळील नातेवाईकांना मित्रमैत्रीणींना डिजिटल कार्ड द्यावे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -