Wednesday, April 17, 2024
घरमानिनीBudget Wedding Tips : कमी बजेटमध्ये लग्नाचे नियोजन कसे करावे?

Budget Wedding Tips : कमी बजेटमध्ये लग्नाचे नियोजन कसे करावे?

Subscribe

लग्नाची खरेदी म्हंटल की खूप पैसे खर्च होतात. जसजसा लग्नाचा हंगाम जवळ येतो तसतसे वेगवेगळे सामान, भरपूर कपडे, शुज, मेकअप, ज्वेलरी, अशा एक ना अनेक गोष्टी या गरजेच्या असतात. मग खरेदीसाठी लागतो भरपूर वेळ आणि पैसा .त्यासाठी काही लोकांना परवडणाऱ्या शॉपिंगच्या टिप्स माहिती असतात. त्यामुळे ते कमी खर्चात शाही लग्न करतात. पण, जर तुम्हालाही कमी पैसे खर्च करून भव्य लग्न करायचे असेल तर जाणून घ्या लग्न खरेदीच्या काही महत्त्वाच्या टिप्स. यामुळे तुमचे पैसे ही वाचतील आणि वेळ ही वाचेल.

लग्नाच्या वस्तूंची यादी बनवा

जर तुम्हाला तुमची खरेदी काहीही न विसरता करायची असेल तर लागणाऱ्या गोष्टींची यादी तयार करत रहा, तसेच त्यातील वस्तू, कुठून घ्यायच्या हे ही लगेचच ठरवा. पोशाख, लग्नाचे दागिने, लग्नपत्रिका, खाद्यपदार्थ. प्रत्येक लग्नात या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे लग्नाच्या पोशाख खरेदी करताताना फक्त वर आणि वधूची खरेदीची प्लानिंग करू नका, तर कुटुंबीय आणि नातेवाईकांचाही समावेश करा.

- Advertisement -

रेंट वेडिंग आउटफिट

प्रत्येकजण त्यांच्या लग्नाचा पोशाख खूप सुंदर आणि खास बनवण्याचा प्रयत्न करतो. ज्यासाठी ते सहसा हजारो आणि कधीकधी लाखो खर्च करतात . पण, तुम्हाला हे देखील मान्य करावे लागेल की हा लग्नाचा पोशाख पुन्हा क्वचितच परिधान केला जाईल. मग अशा गोष्टीसाठी इतके पैसे खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा लग्नाचा पोशाख भाड्याने घेऊ शकता. आजकाल अनेक वेबसाइट्स आहेत जिथून तुम्ही डिझायनर पोशाख भाड्याने घेऊ शकता.

महागड्या कार्डांऐवजी ई-आमंत्रण

जगात आणि जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर एवढा वाढला आहे की त्याचा फायदा आपण घेतला नाही तर ते आपले अज्ञान ठरेल. आजकाल जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सॲप किंवा इतर तत्सम ॲप वापरतो, म्हणून लोकांना कार्ड पाठवण्याऐवजी, ई-आमंत्रणे पाठवा. मुद्रित कार्डांच्या तुलनेत, यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च होणार नाही कारण तुम्ही ऑनलाइन ॲप किंवा ग्राफिक डिझायनर मित्राच्या मदतीने ते सहजपणे स्वतः बनवू शकता. यामुळे कार्ड प्रिंटिंग आणि पोस्टिंगवर पैसे तर वाचतीलच शिवाय कागदाचीही बचत होईल आणि लोकांसमोर एक चांगला आदर्श निर्माण होईल.

- Advertisement -

सजावटीवर होणारा खर्च कमी करा

महागड्या सजावटीवर पैसे खर्च करणे व्यर्थ आहे आणि त्याशिवाय तुम्ही लग्न करू शकता. सजावटीसाठी झेंडूसारख्या स्थानिक फुलांचा वापर करा, ज्यांचे शेल्फ लाइफ जास्त आहे आणि ते स्वस्त देखील आहेत. याशिवाय वेगवेगळ्या रंगांचे दुपट्टे आणि पेंडेंट वापरा, जे तुम्हाला कोणत्याही घाऊक बाजारात अगदी वाजवी दरात सहज मिळू शकतात.

अन्नपदार्थांवर पैसे कसे वाचवायचे?

पाहुण्यांच्या लक्षात राहतील ते लग्नाचे जेवण. लग्नाच्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात अजिबात संकोच करू नका. पाहुण्यांची यादी करा, मेन्यू ठरवा, यानंतर, ऑनलाइन किराणा मालाचे दर देखील तपासा. सरळ होलसेलच्या किराणा दूकाणात जाऊन सौदा करा. अशा प्रकारे तुम्ही या वस्तू स्वस्त दरात खरेदी करू शकता. अन्न वाया जाणार नाही याची काळजी ही घ्या.

- Advertisment -

Manini