Saturday, February 8, 2025
HomeमानिनीBulky Back Blouse Designs : चब्बी पाठीसाठी ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स

Bulky Back Blouse Designs : चब्बी पाठीसाठी ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स

Subscribe

आजही भारतीय महिलांच्या आवडत्या आऊटफिटच्या यादीत साडी अव्वल स्थानावर आहे. याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे, साड्यांमध्ये आपल्याला खूप वैविध्य मिळते आणि दुसरे म्हणजे, आता तुम्हाला ब्लाउजच्या डिझाइनमध्येही वेगवेगळे लूक्स आणि स्टाइल्स मिळू लागले आहेत. पण ब्लाउजचे डिझाईन्स अतिशय काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. विशेषत: ज्यांची पाठ जाड आणि रूंद आहे तसेच फॅटी आहे. त्यांच्यासाठी ब्लाउजच्या मागील डिझाइनची योग्य निवड करणे खूप महत्वाचे आहे ज्यामुळे पाठ सडपातळ दिसू शकेल. आज आपण पाहूयात अशाच काही ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन्स ज्यामध्ये तुम्ही बारीक दिसू शकाल आणि तुमच्या साडीला परफेक्ट क्लासी लूकही मिळू शकेल.

1. बॅक कटआउट डिझाइन ब्लाउज :

Bulky Back Blouse Designs  Trendy blouse designs for chubby back

ज्या महिलांना त्यांच्या साडीसोबत थोडासा बोल्ड आणि स्टायलिश लूक हवा आहे त्यांच्यासाठी बॅक कटआउट डिझाइनचा ब्लाउज योग्य आहे. या डिझाईनमध्ये पाठीच्या मध्यभागी कटआउट असतो, जो आकर्षक तर दिसतोच सोबत पाठीवरची चरबी लपविण्याचंही काम करतो. या प्रकारचा ब्लाउज जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्या किंवा फ्लोरल प्रिंट आणि हलक्या वजनाच्या साड्यांसोबत चांगला दिसेल. हे ब्लाउज डिझाइन पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.

2. फुल बॅक दोरी डिझाइन ब्लाउज :

Bulky Back Blouse Designs  Trendy blouse designs for chubby back

 

फुल बॅक दोरी डिझाइन ब्लाउज संपूर्ण पाठ कव्हर करते आणि त्यात 3 किंवा 4 दोरी किंवा लेसेस असतात, ज्यामुळे हा ब्लाऊज स्टायलिश दिसतो. हे डिझाइन अशा स्त्रियांसाठी परफेक्ट आहे ज्यांना त्यांची पाठ तर झाकायची आहे आणि त्याच वेळी स्टाईलशीही तडजोड करायची नाही. बनारसी सिल्क आणि हेवी वर्कपासून बनवलेल्या पारंपरिक साड्यांसोबत हे ब्लाऊज डिझाइन चांगले दिसू शकेल.कोणत्याही लग्नात किंवा सणासुदीला तुम्ही ते कॅरी करू शकता.

3. अपर साइड बॅक दोरी डिझाइन ब्लाउज :

Bulky Back Blouse Designs  Trendy blouse designs for chubby back

या ब्लाउजच्या डिझाईनमध्ये पाठीच्या वरच्या बाजूला एक स्ट्रिंग असते, ज्यामुळे एक आकर्षक लूक येतो. हे डिझाइन केवळ पाठीची चरबी लपवत नाही तर साडीला एक आकर्षक लूक देखील देते. या प्रकारच्या दोरी ब्लाउजमध्ये तुम्ही फॅन्सी पेंडेंट्स देखील अॅड करू शकता. हे ब्लाउज डिझाइन कॉटन आणि खादीच्या साड्यांसोबत खूप छान दिसते. साध्या आणि सोबर लूकसाठी तु्म्ही हे डिझाइन ट्राय करू शकता. ऑफिसच्या कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही ते कॅरी करू शकता.

4. नेट वर्क बॅक डिझाइन ब्लाउज :

Bulky Back Blouse Designs  Trendy blouse designs for chubby back

ज्या महिलांना साडीत थोडं ग्लॅमरस दिसायचं आहे त्यांच्यासाठी नेट वर्क बॅक डिझाइनचा ब्लाउज हा उत्तम पर्याय आहे. या डिझाइनमध्ये मागील बाजूस नेट फॅब्रिक वापरण्यात येते. जे अतिशय आकर्षक दिसते. जर तुम्ही सॅटिन किंवा मखमली फॅब्रिकचा ब्लाउज वापरणार असाल तर तुम्ही त्यावर असा प्रयोग करू शकता. या प्रकारच्या ब्लाउज डिझाइनसह तुम्ही हलके शिफॉन आणि जॉर्जेट साड्या कॅरी करू शकता. हे ब्लाउज डिझाइन पार्टी आणि कॉकटेल इव्हेंटसाठी योग्य ठरू शकते.

5. लोअर साइड बॅक दोरी डिझाइन ब्लाउज :

Bulky Back Blouse Designs  Trendy blouse designs for chubby back

लोअर साइड बॅक डोरी डिझाइन ब्लाउज ज्या स्त्रियांना त्यांच्या पाठीचा खालचा भाग झाकायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. या डिझाइनमध्ये तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या खालच्या बाजूसाठी स्ट्रिंग किंवा लेस वापरू शकता, ज्यामुळे तुमच्या ब्लाउजला एक क्लासी लूक मिळेल. कांजीवरम आणि पटोला साड्यांसोबत ब्लाउजची ही डिझाइन खूप छान दिसते. तुम्ही हेवी वर्क ब्राइडल साडीसोबतही हे डिझाइन कॅरी करू शकता. पारंपरिक आणि लग्नाच्या प्रसंगांसाठी हा एक योग्य पर्याय आहे.

ब्लाउजची डिझाइन निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

नेहमी कम्फर्टेबल आणि तुमच्या शरीराला शोभेल असे फॅब्रिक निवडावे.
योग्य फिटिंग ब्लाउज केवळ तुमचा लूकच वाढवत नाही तर तुम्हाला आत्मविश्वास देखील देतो.
नेहमी साडीच्या पॅटर्ननुसार आणि प्रसंगानुसार ब्लाउज डिझाइन निवडावे.
पाठीमागे डिझाइन केलेल्या ब्लाउजसह योग्य ॲक्सेसरीज परिधान केल्यास तुमचा लूक आणखी खास बनू शकतो.

हेही वाचा : Beauty Tips : आठवड्यातून एकदा स्टीम घेणे त्वचेसाठी फायदेशीर


Edited By – Tanvi Gundaye

Manini