अशी बहुतांश लोक असतात ज्यांना आयुष्यात नेहमीच काही एडवेंचर्स करायचे असते. अशी लोक जेव्हा कधी फिरायला जातात तेव्हा एडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजची मजा घेतात. त्यापैकीच एक म्हणजे बंजी जंपिंग. असे करताना तुम्ही हवेतून खाली पडत असल्याचा अनुभव येतो. भले तुम्ही उडू शकत नाहीत पण आकाशातून खाली पडतानाचा अनुभव घेता येतो. पण तुम्ही पहिल्यांदाच बंजी जंपिंग करत असाल तर पुढील काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
सेफ्टीची काळजी घ्या
बंजी जपिंग करताना तुम्हाला उंचावरून खाली पडता. त्यामुळे सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे सेफ्टीची काळजी घेणे. प्रयत्न करा की, बंजी जपिंग करताना तुम्ही अनुभवी आणि विश्वासू एडवेंचर कंपनीची निवड करा. लक्षात ठेवा असे करताना तुम्ही तुमचे आयुष्य त्यांच्या हातात देत आहात. त्यामुळे त्यांना बंजी जपिंगचा उत्तम अनुभव असावा. बंजी जंपिंगसाठी अधिक पैसे असतील त्यावेळी कंजूसपणा करू नये. आपल्या ट्रेनरसोबत बंजी जपिंगपूर्वी त्याच्या क्वालिफिकेशनबद्दल जाणून घ्या.
ओव्हरथिंक करण्यापासून दूर रहा
जी लोक पहिल्यांदा बंजी जपिंग करतात ते फार उत्साहित असतात. परंतु उडी मारण्यापूर्वी काही सेकंद ते अधिक विचार करू लागतात. त्यांच्या मनात विविध विचार आल्याने बंजी जपिंग करावे की नाही अशी त्यांची द्विधा मनस्थिती होते. त्यामुळे बंजी जपिंग करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या आणि ओव्हरथिंक करण्यापासून दूर रहा.
सैल कपडे घाला
जेव्हा तुम्ही बंजी जपिंग करत असाल तेव्हा तुमचे कपडे सैल असावेत. या दरम्यान तुमचे शूज घाला. स्लिप ऑन, हिल्स अशा चप्पल्स घालू नका. या व्यतिरिक्त स्कर्ट आणि ड्रेस सारखे कपडे घालू नका.
मेडिकल चेकअप करा
बंजी जपिंगचा अनुभव एडवेंचर असेलच पण त्याआधी मेडिकल चेकअप करा. यासाठी तुम्ही व्यवस्थितीत फिट आहात का हे पहा. यासाठी डॉक्टरांकडून मेडिकल चेकअप करून घ्या, जर तुम्हाला ताप जरी आला असेल तरीही बंजी जपिंग करणे टाळा.
जपिंगपूर्वी अधिक खाऊ नका
जर तुम्ही बंजी जपिंग करणार असाल तर हलके पदार्थ खा. उपाशी पोटी बंजी जपिंग करत असाल तर चक्कर किंवा बेशुद्ध पडू शकता. त्याचसोबत अधिक खात असाल तर उलटी होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात खा.
हेही वाचा- नोव्हेंबर महिन्यात फॅमिलीसोबत फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन