Burger Recipe: घरच्या घरी बनवा झटपट बर्गर

बर्गर हा पदार्थ असा आहे जो सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलं देखील बर्गर खाणं खूप पसंत करतात. अशावेळी घरामध्ये बनवलेला बर्गर खाणं कधीही उत्तम ठरेल

आजकाल अनेकजण मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खाणं पसंत करतात. तसेच लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खाण्यापिण्याच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. मात्र बर्गर हा पदार्थ असा आहे जो सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलं देखील बर्गर खाणं खूप पसंत करतात. अशावेळी घरामध्ये बनवलेला बर्गर खाणं कधीही उत्तम ठरेल.

वेज बर्गर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • 1 चिरलेला कांदा
 • 1 चिरलेला टोमॅटो
 • 2 लाल मिरची पावडर
 • 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर
 • 2 चमचा तेल
 • 4 अर्धे बर्गर बन्स
 • 3 चमचा ब्रेडक्रंब
 • टोमॅटो सॉस
 • अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट

बर्गरमधील पॅटिस बनवण्यासाठी साहित्य :

 • 1/2 चिरलेली काकडी
 • 2 उकडलेला बटाटा
 • 2 चिरलेला कांदा
 • 2 चिरलेला गाजर
 • 1/2 कप मका
 • 1/2 ताजे वाटाणे

कृती :

 • बर्गर पॅटिस बनवण्यासाठी गाजर, वाटाणे आणि मका एका कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत उकडून घ्या.
 • आता एका मोठ्या भांड्यात उकडलेल्या भाज्या, उकडलेला बटाटा , चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
 • या मिश्रणाचे छोट्या पॅटीसचा आकार द्या.आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तयार पॅटीसच्या बाजूने ब्रेडक्रंब लावा आणि हे कढईत तळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत पॅटिस तळून घ्या.
 • आता बर्गर बनच्या अर्ध्या भागावर बटर लावा आणि त्यावर कांदा, काकडी आणि टोमॅटोच्या पातळ स्लाइस ठेवा, तसेच त्यावर तयार पॅटिस ठेवा.
 • स्लाईस आणि पॅटिसवर बर्गर बनचा दुसरा भाग ठेवून,टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :उरलेल्या भातापासून बनवा झटपट फ्राईड राईस