Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health Butter आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते का?

Butter आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते का?

Subscribe

डेअरी प्रोडक्ट्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हेल्थ एक्सपर्ट्स असे मानतात की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहारात डेअरी प्रोडक्ट्सचा जरुर समावेश करावा. दही-दूध, पनीर सारख्या प्रोडक्ट्समध्ये कॅल्शिअम, प्रोटीनसह शरीराला आवश्यक असणारी काही तत्त्वे मिळतात. मात्र जेव्हा याच डेअरी प्रोडक्ट्समधील बटर बद्दल बोलले जाते तेव्हा नेहमीच असा प्रश्न उपस्थितीत होतो की, हे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असते का? (Health care tips)

संशोधक असे म्हणतात की, बटरमध्ये कॅलरीज अधिक असतात. हेच कारण आहे की, हेल्थ एक्सपर्ट्स याचे कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात. कमी किंवा मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र अधिक सेवन केल्यास आरोग्यासंबंधित जोखीम वाढू शकते.

- Advertisement -

हाय कॅलरीजमुळे वाढू शकते तुमचे वजन
हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, जर तुम्ही दररोज किंवा अधिक प्रमाणात बटरचे सेवन करत असाल तर यामुळे वजन वाढले जाऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेल्या अधिक कॅलरीज.

संशोधक असे म्हणतात तुम्ही दररोज अधिक कॅलरेजीचे सेवन करत असाल तर आणि कमी कॅलरीज बर्न करत असाल तर यामुळे वजन वेगाने वाढू शकते. अशातच तुम्ही वजन कमी करत असाल बटरचा आहारात कमी प्रमाणात समावेश करावा.

- Advertisement -

सॅच्युरेडेट फॅट वाढण्यासह वाढू शकतात आजार
हाय कॅलरीजसोबत बटर मध्ये सॅच्युरेडेट फॅट सुद्धा अधिक असतात. हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, याचे अधिक सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दोन मोठे चमचे बटर मध्ये 14 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असतात. दररोज ऐवढ्या प्रमाणात शरिरासाठी काही प्रकारे नुकसानदायक मानले जाते. अधिक बटर खाल्ल्याने तुमच्या आतड्याची चरबी वाढली जाते. जे पनचासंबंधित समस्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

कोलेस्ट्रॉलची सुद्धा होऊ शकते समस्या
सॅच्युरेटेड फॅट असलेले अधिक फूड्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढले जाऊ शकते. कोलेस्ट्रॉलला हृदय रोगासंबंधित प्रमुख जोखिमीचे कारक मानले जाते. अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले फूड तुमच्या रक्कात एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवू शकतात. तुमच्या रक्कात एलडीएल कोलेस्ट्रॉलचा उच्च स्तर हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट्स असे मानतात की, बटर असणाऱ्या फूड्सचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.


हेही वाचा- संध्याकाळी सातच्या आत जेवणं, खरचं हेल्दी आहे का?

- Advertisment -

Manini