Wednesday, February 21, 2024
घरमानिनीBeautyब्रॅण्डेडच्या नावाखाली नकली प्रॉडक्ट खरेदी करण्यापासून राहा सावध

ब्रॅण्डेडच्या नावाखाली नकली प्रॉडक्ट खरेदी करण्यापासून राहा सावध

Subscribe

कॉलेज, ऑफिसला जाताना अनेकजणी आवर्जुन मेकअप करतात. मेकअपमुळे चेहऱ्यावरील डाग किंवा व्रण लपवण्यास मदत होते. परंतु तुम्ही वापरत असलेले मेकअप प्रोडक्ट चांगल्या दर्जाचे आहे की नाही? हे तापसणं खूप गरजेचं आहे. अनेक महिला ब्रॅण्डेड ब्युटी प्रॉडक्टच्या नावाखाली महाग आणि नकली मेकअप ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करतात. मात्र, ज्यावेळी हे प्रॉडक्ट चेहऱ्यावर अप्लाय केले जाते तेव्हा तसा रिझल्ट मिळत नाही. अनेकदा यामुळे त्वचेचे नुकसान होते. म्हणूनच मेकअपचे साहित्य खरेदी करताना नकली प्रॉडक्ट कसे ओळखता येतील. यासाठी आम्ही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत.

नकली प्रॉडक्ट कसे ओळखाल?

Top 10 Cosmetic Companies in India | Best Cosmetic Companies in India

- Advertisement -

 

  • प्रॉडक्टची पॅकिंग चेक करा

पॅकेजिंगद्वारे तुम्ही खऱ्या आणि नकली मेकअप प्रॉडक्टमधील फरक ओळखू शकता. कमी दर्जा असणारे प्लास्टिक, फिकट रंग आणि योग्य फिटिंग नसणारे मिरर पाहून तुम्ही खरेदी करीत असलेले मेकअप प्रोडक्ट नकली आहेत हे सहज ओळखता येतं. अनेकदा प्रॉडक्टचे नाव बरोबर लिहिलेली नसते. म्हणजेच, उत्पादनाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काहिसा बदल दिसतो. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे.

- Advertisement -
  • किंमतीमधील फरक

ब्रॅण्डेड उत्पादने नेहमी लायसन्स असलेल्या किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकले जातात. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेल्या विक्रेत्यांकडे मिळणारे प्रॉडक्ट ब्रॅण्डेड आहेत का याची खात्री करा. तुम्ही जर ब्युटी प्रॉडक्ट ऑनलाइन खरेदी करत असाल तर त्या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि तिथून खरेदी करा. तसेच लायसन्स नसलेल्या स्टोअर्समध्ये नकली ब्युटी प्रॉडक्ट उपलब्ध असतात आणि त्यांची किंमत ब्रॅण्डेड प्रॉडक्टच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे तुम्हाला ओरिजनल प्रॉडक्टची किंमत माहित असणं आवश्यक आहे.

  • सोशल मीडियावरील शॉपिंगपासून सावध रहा

सोशल मीडियावर अनेक अकाऊंटवर ब्युटी प्रॉडक्टची विक्री केली जाते. यासर्व अकाऊंटच्या माध्यमातून विक्री होणारे प्रॉडक्ट 100 टक्के ओरिजनल असल्याचे सांगितले जाते. तसेच हे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देखील दिल्या जातात. त्यामुळे हे ऑनलाईन प्रॉडक्ट काळजीपूर्वक खरेदी करा.

 

 


हेही वाचा :

पंन्नाशीतही दिसायचंय आकर्षक? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini