Thursday, May 25, 2023
घर मानिनी Health C section डिलिव्हरी नंतरची लाईफ स्टाईल कशी असावी

C section डिलिव्हरी नंतरची लाईफ स्टाईल कशी असावी

सीजर करुन बाळाला जन्म दिलेल्या आईला तिच्या आरोग्याची फार काळजी घ्यावी लागते. लहानशी चुक सुद्धा तिला महागात पडू शकते. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर योग्य वेळी उठणे, झोपणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यामुळे ब्लड क्लॉट होण्यापासून दूर राहता येते. तज्ञ असे सांगतात की, फिरण्याने अथवा एखादी अॅक्टिव्हिटी करताना मात्र काही गोष्टींची काळजी घ्यावी.

खरंतर सीजेरियन बर्थ नंतर खाणेपिणे आणि आपल्या नियमित हालचालींवर महिलेने लक्ष ठेवले पाहिजे. डॉक्टर ज्या गोष्टींची काळजी घेण्यास सांगतात त्याकडे दुर्लक्ष करु नये. अशातच महिलांनी आरोग्याची एकूणच काळजी घेतली तर त्या ४-८ आठवड्यात ठिक होऊ शकतात. तर पुढील काही गोष्टी महिलांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

- Advertisement -

-सर्जरीनंतर ४८ तासानंतर स्वत:चे शरिर ओलं होईल याची काळजी घ्यावी. असे न केल्यास तुमचे सर्जिकल जखमा ओल्या होऊ शकतात आणि संक्रमणाचा धोका वाढतो. यावेळी टाक्यांना तुम्ही हळूवारपणे स्वच्छ करु शता. मात्र त्यांना ओलं करु नका.

- Advertisement -

-सी सेक्शनंतर काही आठवड्यापर्यंत योनित काही जाऊ देऊ नका. सर्वसामान्यपणे ६ आठवड्यानंतर किंवा डॉक्टरांच्या परवानगीनंतर सेक्स तुम्ही करु शकता.

-प्रसुतीनंतर ६-१२ महिन्यानंतरच वेट लॉसचा विचार करावा. बहुतांश महिला बाळाला जन्म दिल्याच्या ६ आठवड्यानंतर अर्ध वजन कमी करु शकतात. जर तुम्ही दररोज हेल्थी डाएट आणि व्यायाम केल्यास तर तुमचे वजन कमी होऊ शकते.

-जर तुम्ही ब्रेस्टफीड करु शकत नाही तर चिंता करु नका. ही गोष्ट सामान्य आहे. याबद्दल अधिक विचार करु नका.

-प्रसुतीनंतर महिलांनी हेवी वर्कआउट करु नये. जसे की, धावणे किंवा अधिक उर्जा लागणारे वर्कआउट.

-तुम्हाला १०० फारेहाईट पेक्षा अधिक ताप असेल तर डॉक्टरांना तातडीने संपर्क साधा. असे करणे बाळ आणि आईच्या आरोग्यासाठी फार गरजेचे आहे.


हेही वाचा- Late Pregnancy प्लान करताय, मग हे वाचा

- Advertisment -

Manini