Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल कॅल्शिअमची कमतरता आहे? मग करा 'या' पदार्थांचे सेवन

कॅल्शिअमची कमतरता आहे? मग करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Related Story

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग जेवढे महत्वाचे आहे तेवढेच या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासाठी कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाणे फार आवश्यक असते. कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडांच्या आरोग्यासाठी सर्व पोषक तत्वे मिळण्यास फायदा होतो. आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ही दोन सर्वात महत्वाची घटक आहेत. तर हाडांना बळकट करण्यासाठी कॅल्शिअमयुक्त पदार्थ घेणे महत्वाचे आहे. शरीराचे कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी कॅल्शिअम खूप महत्वाचे असते आणि ते व्हिटॅमिन डी द्वारे मिळते.

हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडे कमकुवत आणि नाजूक बनतात. यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते. तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता आहे? तर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन. ज्यामुळे कॅल्शिअमची कमी होईल दूर, हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

अंडे

- Advertisement -

शरीरास आवश्यक ते सर्व पोषक आणि खनिज पदार्थ आपल्याला अंड्यातून मिळतात. रोज सकाळी अंडी खाल्याने शरीरास व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. अंड्यात ऊर्जा वाढवणारे पोषक तत्व असतात. जर तुम्ही एका ग्लास संत्राच्या रसात मिसळून घेतल्यास संपूर्ण दिवस फिट राहू शकतात.

दूध

रोज एक ग्लास दूध प्यायल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. लहानपणापासूनच हाडांची मजबुती आणि कॅल्शिअमचे कार्यक्षम स्त्रोत म्हणून दूध पिणं महत्त्वाचं मानलं जातं.

पनीर

- Advertisement -

शरीरासाठी कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे. पनीर हे दुधापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ आहे, जे आपल्या शरीरासाठी कॅल्शिअम वाढवण्यासाठी मदत करतात. पनीरसह चीन आणि बटर देखील दैनंदिन आहारात तुम्ही वापरू शकतात. मोत्जारेला चीजमध्ये कॅल्शिअम जास्त असते आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यासह त्यात फायबरची चांगली मात्रा असते. यामध्ये इतर पौष्टिक पदार्थ देखील असतात, जे आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात.

- Advertisement -