Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health हाडांच्या बळकटीसाठी महिलांनी करावे 'या' पदार्थांचे सेवन

हाडांच्या बळकटीसाठी महिलांनी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

जसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या शरिरातील हाडं ही कमकुवत होऊ लागतात. हाडं बळकट नसतील तर गुडघे दुखीची समस्या सर्वात प्रथम सुरु होते. अशातच कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन करुन तुम्ही तुमची हाडं बळकट करू शकता. अशातच कॅल्शिअमयुक्त असे कोणते पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमची हाडं अधिक बळकट करू शकता हे पाहूयात. (calcium rich foods for strong bones)

-दूध
कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असलेल्या पदार्थापैकी एक म्हणजे दूध. 100 ग्रॅम दूधामुळे शरिराला 125mg पर्यंत कॅल्शिअम मिळते. या व्यतिरिक्त दह्यात सुद्धा कॅल्शिअम असते.

- Advertisement -

-संत्र
महिलांमध्ये कॅल्शिअमची पुरतता पूर्ण करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये संत्र्याचे सेवन करू शकता. एका संत्र्यामध्ये 60mg पर्यंत कॅल्शिअम असते. त्याचसोबत व्हिटॅमिन सी ची कमतरता सुद्धा यामुळे पूर्ण केली जाते. त्याचसोबत संत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते.

-सोया
जी लोक दूध पित नाहीत अथवा वीगन डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी सोया हे उत्तम कॅल्शिअमचा स्रोत आहे. कॅल्शिअमचे सेवन करण्यासाठी सोया, सोयाबीन, टोफू, सोया मिल्क डाएटमध्ये समावेश करु शकता.

- Advertisement -

-अंजीर
कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन ए, बी1, बी2, अंजीर, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि क्लोरिन अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात असते. तुम्ही सुकलेले अथवा जाते अंजीर खाऊ शकता. एका मध्यम आकाराच्या अंजीरमुळे तुमच्या शरिराला 55mg पर्यंत कॅल्शिअम मिळते.

-ब्रोकोली
ब्रोकोली त्या भाज्यांपैकी एक आहे ज्यामुळे शरिराला उत्तम प्रमाणात कॅल्शिअम मिळते. ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि इम्युनिटी वाढणवारे गुण असतात. दरोरज जमत नसेल तर आठवड्यातून 2-3 वेळा ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.


हेही वाचा- तुम्ही देखील मुलांना भिजवलेले बदाम देता? मग आधी ‘हे’ वाचा

- Advertisment -

Manini