बहुतांश महिला अशा आहेत ज्यांच्या काल्फ मसल्सवर जमा झालेले फॅट्स समस्येचे कारण ठरतात. यामुळे त्या स्कर्ट्स किंवा मिनीज अथवा मिडीज घालू शकत नाहीत. खरंतर पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काल्फ मसल्सवर जमा झालेले अतिरिक्त फॅट बर्न करणे अत्यंत गरजेचे असते. अशातच पुढील काही काल्फ मसल्सच्या पुढील काही एक्सरसाइजने तुम्ही तुमच्या पायांचे सौंदर्य वाढवू शकता.
-जंप स्क्वॉट्स
या एक्सरसाइजच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय ते खांदे दुखीची समस्या दूर करू शकता. त्याचसोबत तुमची बॉडी टोन्ड होण्यास ही मदत होते. जंप स्क्वॉट्स एक्सरसाइज केल्याने शरीराचा स्टॅमिना वाढला जातो. त्यामुळे तुम्ही थकवा आणि बैचेन सारख्या समस्येपासून दूर राहता.
-सिंगल लेग स्क्वॉट्स
ही एक्सरसाइज केल्याने आपल्याला पायदुखीच्या समस्येपासून दूर राहता येते. त्याचसोबत तुमचे शरीर लवचीक होण्यास मदत होते. शरीराला हेल्दी आणि मजबूत बनवण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर मानली जाते. पायांवर जमा झालेले अतिरिक्त फॅट्स यामुळे दूर होतात.
-पाइल काल्फ रेजिज
ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या डेली वर्कआउटमध्ये सहभागी करू शकता. यामुळे काल्फ मसल्ससह आजूबाजूच्या स्नायूंची स्ट्रेंन्थ ही वाढली जाते. शरीर हेल्दी आणि लवचीक होते. या व्यतिरिक्त या एक्सरसाइजच्या मदतीने तुमचे मन हलके राहते.
-सूमो स्क्वॉट्स
सूमो स्क्वॉट्स आपल्या शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतो. ही एक्सरसाइज केल्याने संपूर्ण वजन काल्फ्सवर येते. त्यामुळे जमा झालेले फॅट्स आपोआप बर्न होऊ लागतात. यामुळे पोटावरील चरबी सुद्धा दूर होते. त्याचसोबत शरीर लवचीक होते.