Wednesday, April 24, 2024
घरमानिनीपुरुष खरचं मुलाला जन्म देवू शकतो का?

पुरुष खरचं मुलाला जन्म देवू शकतो का?

Subscribe

भारतात पहिल्यांदाच पुरुष ट्रान्सजेंडरने एका मुलाला जन्म दिला आहे. केरळातील कोझिकोड मध्ये राहणाऱ्या ट्रांन्स कपल जिया आणि जहाद यांनी यापूर्वी इस्टाग्रामवर फोटो सुद्धा शेअर केले होते. या बद्दल संपूर्ण देशात जोरदार चर्चा केली जात आहे. परंतु या दोघांमध्ये लिंग बदलल्यानंतर जहादने आपले दोन्ही स्तन काढून टाकले.. दरम्यान, ब्रेस्ट रिमूवल सर्जरी पूर्ण झाली नव्हती. अशा प्रकारे पुरुष बनवण्याची प्रक्रिया ही अपूर्ण राहिली होती, अशातच त्याच्यामध्ये संभोग झाल्याने जहाद प्रग्नेट झाला

जहादच्या मते, कोझिकोड शासकीय मेडिकल महाविद्यालयातील रुग्णालयात लिंग बदलासाठी त्याची थेरपी सुरु आहे. आता पुन्हा पुरुष बनण्याची प्रक्रिया नव्याने सुरु केली जाणार आहे. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, पुरुष खरंच मुलाला जन्म देऊ शकतो का? याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

- Advertisement -

प्रग्नेंट होण्यासाठी पुढील गोष्टी महत्वाच्या असतात

प्रेग्नेंसीसाठी सर्वसामान्यपणे तीन गोष्टींचा आवश्यकता असते, स्पर्म एग, युट्स आणि काही हार्मोन्स, नैसर्गिक प्रक्रियेत पुरुषाच्या सीमेनमधून स्पर्म बाहेर पडतात. याची संख्या लाखोंमध्ये असते. महिलांमध्ये ओवरीमधुन एग बाहेर पडतात. जेव्हा पुरुष आणि स्री एकमेकांसोबत संभोग करतात तेव्हा सीमेनच्या माध्यमातून स्पर्म हे मॅच्युअर एग पर्यंत पोहचतात. तेव्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये त्याला फर्टिलाइज केले जाते. फर्टिलाइज झाल्यानंतर हे एग महिलेच्या युट्रेसमध्ये जातात. असे सर्व झाल्यानंतर प्रेग्नेंसीची प्रक्रिया सुरु होते. प्रेग्रेसीला सपोर्ट करण्यासाठी hCG, hPL, एस्ट्रोजेन सारखे हार्मोन्सची गरज असते. जे महिलेच्या शरिरातून बाहेर पडतात..

सामान्य पुरुष प्रेग्नेंट होऊ शकतो का?

यूट्स नसेल तर सामान्य पुरुष प्रेग्नेंट होऊ शकत नाही. जर एखाद्या पुरुषाने आपल्या शरिरात युट्स ट्रान्सप्लांट कैले असेल तरीही प्रेग्नेंट होऊ शकत नाही. कारण आई होण्यासाठी काही बायोलॉजिकल प्रक्रियेची गरज असते.

- Advertisement -

जोसेफ फ्लेचर नावाच्या एका लेखकाने १९७४ मध्ये ‘द एथिक्स ऑफ जेनेटिक कंट्रोल नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात पहिल्यांदा त्याने पुरुषांमध्ये युट्र्स ट्रान्सप्लांटची कल्पना दिली. त्याचे असे मानणे होते की, महिलांप्रमाणेच पुरुषांच्या शरिरात ही स्तन, पिट्युरी ग्लैंड्स असतात, ज्याच्या माध्यमातून ते बाळाला दूध देऊ शकतात.

पुरुष हा आई बनवण्याची एक प्रकारची एब्डॉमिनल प्रेग्नेंसी आहे. यामध्ये आयवीएफच्या मदतीने एग आणि

स्पर्मला लॅब मध्ये फर्टिलाइज केले जाते. त्यानंतर लॅबमध्ये डेवलप करुन त्याला एन्डॉमनमध्ये ट्रांसप्लांट केले जाते. यासाठी हार्मोन्स थेरेपीची मदत घेतली जाते. अशा प्रकारे मुलं जन्माला घालणे धोकादायक असते.

ऋग्वेदात ही पुरुष जन्माला घालण्याचा उल्लेख

शंकर आणि पार्वतती संदर्भात ऋग्वेदात एक अत्यंत लोकप्रिय धार्मिक किस्सा आहे यामध्ये असे सांगितले गेले आहे की. शंकर-पार्वकी अंबिका वनात फिरताना प्रेमात लीन होते. तेव्हा काही ऋषी तेथे आले. ऋषी तेथे आल्याने पार्वती लाजली. यामुळे शंकराला राग आला आणि त्याने शाप दिला की, जो कोणीही अंबिका वनात प्रवेश करेल तो स्री रुप धारण करेल.

एकदा मनुचे पुत्र राजा ईल अंबिका वनात आले आणि तेव्हा ते सी झाले. यामुळे दुखी झालेल्या ईलने आपले नाव बदलून ईला असे ठेवले. त्यानंतर त्याची भेट ऋषी बुध यांच्यासोबत झाली. दोघांच्या विवाहानंतर ईलाने पुरुरवाला

जन्म दिला. त्यांनी आपल्या आईला शापातून मुक्त केले आणि ईला पुन्हा राजा ईल झाला. याच पुरुरवा याला अप्सरा उर्वशीवर प्रेम जडले होते. ऋग्वेदात ही यांच्या प्रेमाची उल्लेख करण्यात आला आहे. हा पुरुष मुलं जन्माला घालण्यासंदर्भातील वेदांमधील उल्लेख केलेला धार्मिक किस्सा आहे.


हेही वाचा :

वहिनी आणि नणंदेचं नातं कसं असावं?

- Advertisment -

Manini