Thursday, March 27, 2025
HomeमानिनीReligiousMoney plant : मनी प्लांट काचेच्या बाटलीत का लावावे?

Money plant : मनी प्लांट काचेच्या बाटलीत का लावावे?

Subscribe

आपल्या देशात अनेक झाडे, वनस्पती आणि नद्यांची पुजा केली जाते. असं म्हणतात की, वृक्षांमध्ये देव वास करतो. शोभेसह अनेक शुभकार्यासाठी घराघरात विविध प्रकारची रोपे लावली जातात. यातील एक झाड म्हणजे मनी प्लांट. सजावटीसाठी घरात मनी प्लांट लावले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, घरात आनंद, समृद्धी आणण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मनी प्लांटची मदत होते. बऱ्याचवेळा लोक मनी प्लांट मातीच्या कुंडीत लावतात. तर काहीजण घरात काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात पाणी भरून वाढवतात.

काचेच्या बाटलीत मनी प्लांट का लावावे?

  • वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार मनी प्लांट काचेच्या बाटलीत आणि त्यात पाणी असे लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक चणचणी दूर होतात.
  • काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने घरातील संपत्तीत वाढ होते. यासाठी तुम्ही मनी प्लांट ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवायला हवे.
  • घरात अशांतता दूर करायची असल्यास मनी प्लांट काचेच्या बाटलीत ठेवावा.
  • मनी प्लांटची मातीपेक्षा पाण्यात वेगाने वाढ होते.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने घराची शोभा वाढते.

या गोष्टी घ्या लक्षात –

  • मनी प्लांटमधील पाणी 4 ते 5 दिवसांनी बदलावे.
  • अस्वच्छ पाण्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
  • तुटलेल्या किंवा चिरा पडलेल्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावू नये, याचे अशुभ परिणाम होऊ शकतात.
  • या पद्धतीने लावा मनी प्लांट –
  • पारदर्शक काचेची बरणी किंवा बाटली निवडावी.
  • मनी प्लांटची बाटली सुर्यप्रकाश येईल त्याठिकाणी ठेवावी.
  • गरज भासल्यास बाजारात मिळणारे लिक्विड फर्टिलाइजर तुम्ही वापरू शकता.

 

 

 

 

हेही वाचा :

Manini