काही लोक अशी असतात जी जिमला जाऊन कार्डिओ करतात. मात्र खरंतर कार्डिओ एक्सरसाइज करण्यासाठी जिमला जाणे गरजेचे नाही. तुम्ही घरच्या घरी हैवी वर्कआउटच्या मदतीने सुद्धा तुमचे वजन कमी करू शकता. कार्डिओ एक्सरसाइजमध्ये व्यायामाचे विविध प्रकार येतात. ते कोणते हे आपण जाणून घेऊयात.तत्पूर्वी त्याचे फायदे काय होतात हे पाहू. (cardio exercises at home)
कार्डियोवास्कुलर व्यायामाला सर्वसामान्यपणे कार्डिओ एक्सरसाइजच्या रुपात ओळखले जाते. शारीरीक हालचालींसह यामध्ये हृदयाचे ठोके ही वाढतात. मात्र असा व्यायाम हृदयासंबंधित फिटनेस उत्तम बनवण्यासाठी मदत करतो आणि याचे काही हेल्दी फायदे सुद्धा होतात.
कार्डिओ एक्सरसाइजमध्ये तुम्ही धावणे, चालणे किंवा सायकल चालवणे असा गोष्टी करू शकता. याचे अनेक फायदे आहेत. त्यानुसार हृदयाचे हेल्थ सुधारले जाते, फुफ्फुसांची क्षमता वाढली जाते, कमी रक्तबाद आणि उर्जेच्या स्तरात वाढ होते.
-जंपिंग जॅक
या एक्सरसाइजमुळे तुमच्या हृदयाची गती वाढली जाते. तसेच हृदयासंबंधित सहनशक्तीत सुधारणा होते. जंपिंग जॅकची एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करु शकता.
-माउंटेन क्लाइम्बर्स
माउंटेन क्लाइम्बर्स ही एक्सरसाइज तुम्ही घरी करू शकता. या व्यायामुळे मुख्य स्नायू, खांदे आणि पायांच्या स्नायूवर लक्ष केंद्रित केले जाते.
-पायऱ्या चढणे
पायऱ्या चढणे ही एक प्रभावी कार्डिओ एक्सरसाइज आहे. यामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. पायऱ्या चढणे किंवा उतरल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य हेल्दी राहते. त्याचसोबत पायाचे मसल्स ही स्ट्राँन्ग होतात.
हेही वाचा- वेट लॉससाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांना करावी लागते जास्त मेहनत