घरताज्या घडामोडीCorona: कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर 'या' सहा गोष्टी जरूर करा

Corona: कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर ‘या’ सहा गोष्टी जरूर करा

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरस कहर कायम आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमधून रिकव्हर झाल्यानंतर जास्तीजास्त लोकांमधील शरीरात अँटीबॉडी तयार होत आहे. हे अँटीबॉडी व्हायरस पुन्हा शरीराच्या संपर्कात येण्यापासून वाचवतात. सध्या प्रतिकारशक्ती शरीरात किती काळापर्यंत राहते यावर जगभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान आता कोरोना व्हायरसमधून रिकव्हर होणारे रुग्ण पुन्हा संक्रमित होत असल्याचे समोर येत आहे.

पुन्हा कोरोना संक्रमित होणाऱ्या लोकांमध्ये काही वृद्ध लोक आहेत तर काही कोरोनातून बरे झाल्यानंतर निष्काळाजीपणा करणारे लोक आहेत. कोरोना काळ सुरू झाल्यापासून मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि सतत हात धुणे यांसारखे नियम सगळ्यांसाठी आहेत. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकांना काही खास नियम आणि काळजी घेणे गरजेचे आहे. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

दररोज व्यायाम करा

- Advertisement -

कोरोनातून ठिक होण्याच्या प्रक्रियेदरम्यान शरीर खूप कमजोर होते. अशा परिस्थितीत व्यायाम करण्यात खूप त्रास जाणवतो. परंतु हळू-हळू व्यायाम आपल्या दररोज कार्य करणाऱ्या लिस्टमध्ये सामिल करा. दररोज व्यायाम केल्याने शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहाल.

पौष्टिक खा

आपल्या जेवणात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. यामुळे आपली प्रकृती लवकर सुधारते. कोरोनामुळे लोकांना खाण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे वजन खूप कमी होते आणि कमकुवतपणा निर्माण होतो. तुमच्या दररोजच्या जेवणात नैसर्गिक उत्पादने, हिरव्या भाज्या आणि अंडी सामील करा. आवश्यकतेनुसार अधिक खा. तुमची प्रकृती ठिक होण्याचा प्रक्रियेत आहे, हे लक्षात ठेवा.

बुद्धीमत्ता वाढवणाऱ्या Activity करा

कोरोना व्हायरसचा बुद्धीवर देखील परिणाम होता. त्यामुळे आपली बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी पजल्स सारखे जास्त डोक लावण्याचा गेम खेळा. सोप्या खेळापासून सुरुवात करा आणि हळूहळू त्याची पातळी वाढवा.

बरे झाल्यानंतर हळू-हळू नियमित जीवनाकडे वळा

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर नियमित जीवनाकडे वळण्यासाठी आपण घाई करतो. हे लक्षात ठेवा की तुम्ही आता एका व्हायरससोबत लढला आहात, ज्याने तुमच्या इम्यून सिस्टिमवर हल्ला केला होता. बरे झाल्यानंतर स्वतःला थोडा वेळा द्या आणि हळू-हळू नियमित जीवनाकडे वळण्याचा प्रयत्न करा.

याकडे दुर्लक्ष करू नका

सर्दी आणि थकवा असो, कोरोनातून बरे झाल्यानंतर अशा समस्या पुन्हा होवू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या डॉक्टरशी लगेच संपर्क साधा आणि या लक्षणांची माहिती द्या.

दुसऱ्या लोकांची मदत घ्या

आपल्या ठिक होण्याच्या प्रक्रियेत दुसऱ्याला सामिल करा. तुम्हाला या दरम्यान जास्तीत जास्त आरामाची गरज आहे हे समजून घ्या. अशा वेळी कोणाचीही गरज लागली तर आपल्या कुटुंबातील लोकांची आणि मित्रांची मदत घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -