Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health जेवणानंतर गोड खायची सवय चांगली की वाईट?

जेवणानंतर गोड खायची सवय चांगली की वाईट?

Subscribe

जेवणानंतर आपल्याला गोड खाण्याची सवय असते. कारण असे मानले जाते की, लंच किंवा डिनर नंतर गोड खाल्ल्याने जेवलेले पचते. काही घरांमध्ये तर डेजर्ट शिवाय जेवण पूर्ण होत नाही असे मानले जाते.अशातच तुम्ही तुमचे चयापचय संतुलित राखण्यासाठी जेवणानंतर गोड पदार्थ खात असाल तर थांबा. तज्ञ काय म्हणत आहेत हे आधीच पहा.(Crave sweets after dinner)

जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होते नुकसान?
पचन ही एक जटिल प्रक्रियेपैकी एक आहे. ज्यामध्ये जेवणाची प्रक्रिया फार महत्वाची मानला जाते. आपण जे खातो त्यामुळेच आपल्या शरिराला उर्जा मिळत राहते. परंतु जेवणानंतर प्रत्येक वेळी गोड खाल्लेच पाहिजे आणि त्यामुळे पचन व्यवस्थितीत होते असे काहीही नाहीय. उलट तुम्ही जेव्हा जेवणानंतर आइस्क्रिम, हलवा असे काही गोड पदार्थ खाता तेव्हा त्यात कॅलरीज खुप असतात. यामुळे तुम्हाला अॅसिडिटी आणि लठ्ठपणा वाढण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने शरिराला जे पोषक तत्व हवे असातत त्याची कमतरता निर्माण होते. या व्यतिरिक्त अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये बॅक्टेरिया असंतुलित होऊ शकते आणि गॅस, पोट फुगणे सारखी ही समस्या तुम्हाला सतावू शकतात.

- Advertisement -

Crave sweets after dinner
Crave sweets after dinner

नैसर्गिक साखरेचे फायदे
जेवणानंतर मिठाईवर निर्भर राहण्याऐवजी हेल्थ तज्ञ सर्वसामान्यपणे एका संतुलित आहाराचा सल्ला देतात. ज्यामध्ये विविध प्रकारच्या पोषक तत्वांनी भरपूर पदार्थ असले पाहिजे. जसे की, फळ, भाज्या. लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅट. गोड पदार्थ किंवा डेजर्ट म्हणून उन्हाळ्यात फळं आणि थंडीत ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. जे नैसर्गिक साखरेचे स्रोत आहेत. अे खाद्य पदार्थ प्रत्येक प्रकारचे शरिराला फायदा पोहचवतात.

- Advertisement -

जर तुम्ही जेवणानंतर हेल्दी स्विट्स खात असाल तर कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. उलट शरिराला त्याचा फायदाच होईल. गोड खाल्ल्याने सेरोटोनिन नावाच्या हार्मोनचा स्तर वाढला जातो. त्यामुळेच गोड खाल्ल्याने आपण आनंदीत होतो. (Crave sweets after dinner)

जी लोक खुप जेवतात त्यांना हाइपोग्लाईसीमियाच्या स्थितीचा सामना करावा लागतो. या स्थितीत ब्लड प्रेशर फार कमी होतो. जे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. या स्थितीपासून दूर राहण्यासाठी गोड खाण्याचा सल्ला दिला जातो. पण यावेळी सुद्धा नैसर्गिक फूड असलेले पदार्थच खा. नेहमीच हे लक्षात ठेवा की, साखरेपासून तयार करण्यात आलले पदार्थ नेहमीच आरोग्यासाठी धोकादायक असतात. अशातच तुम्ही ब्राउन शुगर पासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करु शकता.


हेही वाचा- उन्हाळ्यात तुम्ही रोज दही खाता का ?

- Advertisment -

Manini