Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health वेगाने वजन कमी करण्यास मदत करेल काजू

वेगाने वजन कमी करण्यास मदत करेल काजू

Subscribe

बहुतांश जणांना असे वाटते की, काजू खाल्ल्याने वजन वाढू शकते. मात्र असे खरेच होते का? खरंतर सर्वांनाच काजू खाणे आवडते आणि यामधून न्युट्रिशन्स ही भरपूर प्रमाणात मिळतात. परंतु तुम्ही दररोज काजू खात असाल तर वजन नियंत्रणात ठेवण्यास तुमची मदत होऊ शकते. (Cashew for weight loss)

काजू खरंच हेल्दी आहेत?
काजू नैसर्गिक रुपात हेल्दी फॅट, प्रोटीन, डायटरी फाइबर, व्हिटॅमिन आणि मिनिरल सारखी पोषक तत्त्वे असतात. कॅलरी असतात तरीही काजू तुम्हाला पुरेशा प्रमाणात पोषण तत्वे मिळतात. अशातच संभाव्य रुपात एकूणच कॅलरीचे सेवन कमी होतात.

- Advertisement -

हेल्दी फॅट
काजूमध्ये हेल्दी फॅटचे प्रमाण अधिक असते. त्याच्यामधील बहुतांश फॅट कंटेट अनसॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे हृदयासाठी हेल्दी मानले जाते आणि एलडीएलचा स्तर कमी होऊ शकतो. हे फॅक्ट तुम्हाला उर्जा देतात आणि तुमचे पोट भरलेले राहते. त्यामुळे अचानक लागलेली भूक कमी होते.

हार्ट हेल्थ
काजूचे सेवन हार्ट डिजीजला कमी करतात. मात्र काजूचे अधिक सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते.

- Advertisement -

माइक्रोन्युट्रिएंट्स आणि अँन्टिऑक्सिडेंट्स
काजूमध्ये काही प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशिअम सारखी खनिजे असतात. जे बायोकेमिकल रिअॅक्शनसाठी मदत करतात. जे एकूणच आरोग्यासाठी सपोर्ट करतात आणि उर्जा वाढवण्यास आणि ग्लुकोज मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करतात.

क्रेविंगला रोखतात
काजूमध्ये असलेले हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर असतात, त्यामुळे क्रेविंग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल तर काजूचे सेवन करू शकता.


हेही वाचा- जिमशिवायही असे करा फॅट बर्न

- Advertisment -

Manini