Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Infertility: आई व्हायचं असेल तर आवर्जून 'या' गोष्टी टाळा...

Infertility: आई व्हायचं असेल तर आवर्जून ‘या’ गोष्टी टाळा…

Related Story

- Advertisement -

पहिल्यांदा आई होण्याचा आनंद निराळाच असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आईचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आई झाल्यानंतर स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ असणं गरजेचं असतं. परंतु आजच्या जीवनशैलीशी संबंधित अनेक गोष्टी, खाण्या-पिण्याच्या सवयी स्त्रियांसाठी वंध्यत्वाचं (इनफर्टिलिटी) कारण ठरू शकतात. याशिवाय शरीरात हार्मोनल असंतुलनामुळे महिला वंध्यत्वाला बळी पडतात. जर एखाद्या स्त्रिला गर्भधारणा होत नसेल ती अक्षम असेल तर तिच्या मनात भीतीसह अनेक शंका उपस्थितीत होतात. या शंका दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी स्त्रिया वंध्यत्वाच्या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकतात, यासंदर्भात काही माहिती दिली आहे.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पोषक तत्वांचा अभाव, शरीराचे वजन, शारीरिक किंवा मानसिक तणाव, अमली पदार्थांचे सेवन इत्यादींचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. संशोधनाच्या मते, वंध्यत्वाचेही धूम्रपान करणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कारण ठरत आहे. याव्यतिरिक्त, गर्भ निरोधक गोळ्यांचे सेवन सातत्याने केल्याने गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ही औषधे शरीराच्या नैसर्गिक संप्रेरकं तयार करण्यास अडथळा करतात, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक वाढतो. स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये एखाद्या महिलेला लैंगिक संक्रमणामुळे किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेमुळे संसर्ग झाल्यास स्त्रिला गर्भधारणा होण्याची शक्यता कमी करते.

याव्यतिरिक्त, एंडोमेट्रिओसिस (अशी परिस्थिती ज्यामध्ये महिलांना पीरियड्स दरम्यान तीव्र वेदना जाणवतात) स्त्रियांमधील वंध्यत्वाचे हे सर्वात सामान्य कारण मानले जाते. आजची व्यस्त जीवनशैली पाहता ताणतणाव देखील साधारण बाब आहे. मात्र अशा परिस्थितीत तणाव देखील स्त्रियांमध्ये वंध्यत्वाला कारणीभूत ठरू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
पीसीओएसमुळे बर्‍याच स्त्रिया वांझपणाचे पीडित होतात. या आजारात, फॅलोपियन ट्यूबमध्ये अल्सर तयार होतात, ज्यामुळे स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत. हा डिसऑर्डर अंडाशयांना अंडी तयार करण्यास प्रतिबंधित करतो आणि ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनचे उत्पादन कमी करते त्यामुळे स्त्रिला गर्भधारणा होऊ शकत नाही.

- Advertisement -

याव्यतिरिक्त, लठ्ठपणा आणि अनियमित पाळी येणं या गोष्टी देखील स्त्रियांमध्ये वंध्यत्व निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांच्या मते, महिला त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करून वंध्यत्व टाळू शकतात जसे की, दारू आणि तंबाखूसारख्या मादक पदार्थांचे सेवन केल्याने स्त्रियांमधील प्रजनन क्षमतेवर त्यांच्या परिणाम होतो. म्हणूनच, महिलांनी मद्यपान, तंबाखू आणि सिगारेट ओढणे शक्यतो टाळले पाहिजे.. तर वंध्यत्व टाळण्यासाठी स्त्रियांना तणावमुक्त राहणे खूप महत्वाचे आहे. योगासने, ध्यान करणे आणि नियमित व्यायाम केल्यास या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. कमी शरीराचे वजन किंवा लठ्ठपणा देखील स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन डिसऑर्डरचे कारण असू शकते.

- Advertisement -