दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. या दिवसात आरोग्याच्या तक्रारी जास्त जाणवतात. आरोग्याच्या तक्रारीसह या दिवसात आणखी एक तक्रार जास्त जाणवते ती म्हणजे वारंवार सू सू होते किंवा एसीमध्ये बसल्यावर हा त्रास सूरू होतो. उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीच्या दिवसात वारंवार लघवीला जावे लागते. पण, याच दिवसात का वारंवार सू सू का होतो? यामागे कारणे काय असतील? तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या,याची कारणे आणि उपाय,
वारंवार सू सू का होते?
मानवाच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असावे लागते. पण, या दिवसात जेव्हा थंडी वाढते तेव्हा हे तापमान राखण्यासाठी रक्ताभिसरण अधिक प्रमाणात होणे आवश्यक असते. यासाठी हृदय खूप जलद गतीने आणि वारंवार पंप होते. यामुळे किडनीसारखे अवयव वेगाने काम करू लागतात. परिणामी, वारंवार लघवीची समस्या उद्भभवते.
यावरील उपाय –
- थंडीच्या दिवसात सामान्य पाण्यापेक्षा तुम्ही थोडे पाणी कोमट करून प्यायला हवे.
- शरीर गरम राहण्यासाठी कान झाकावेत.
- चहा, कॉफी कमी प्रमाणात प्यावे.
- घरातील खोल्या उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- रात्री झोपण्यापूर्वी गरम दुध प्यावे. दुधात तुम्ही हळद टाकू शकता.
- शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही सूप पिऊ शकता.
पुरुषांपेक्षा महिलांनामध्ये प्रमाण अधिक –
थंडीच्या दिवसात महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सू सू ला जावे लागते. काहीजणी थंडीचे दिवस आहेत, असे समजून ही बाब सोडून देतात. पण, स्त्रियांमध्ये जाणवणाऱ्या या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हे एखाद्या गंभीर आजाराचे कारण असू शकते. तुम्हाला UTI संसर्ग,योनिमार्गाचा दाह. किडनी स्टोन, हार्मोनल बदल, डायबिटीस. स्ट्रेस अशी कारणे असू शकतात. त्यामुळे गंभीर समस्यांमा आमंत्रण देण्याऐवजी वेळतच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde