Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल सावधान 'या' पदार्थांमुळे कमी होते रोगप्रतिकारकशक्ती

सावधान ‘या’ पदार्थांमुळे कमी होते रोगप्रतिकारकशक्ती

बेजबाबदार वागण्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे

Related Story

- Advertisement -

सध्याच्या महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्ती रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य देत आहे. पण काहीजण मात्र याकडे दुर्लक्ष करत वाटेल ते खाताना दिसतात. पण अशाच बेजबाबदार वागण्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे हे त्यांना कळत नाही. यामुळे कोणत्या पदार्थांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. ते बघूया.

सिगारेट
सिगारेट, वीडी, हुक्का किंवा अशा प्रकारचे धूम्रपान सरळ फुफ्फुसावर अटॅक करते. यामुळे फुफ्फुस कमकुवत होते. फुफ्फुसाचे कमकुवत असणे हे रोगप्रतिकारकशक्तीसाठी आव्हान असते. यामुळे कुठल्याही आजाराचा संसर्ग लवकर होतो.

- Advertisement -

मद्यपान
अल्कोहोलयुक्त सॅनेटायझरमुळे कोरोना व्हायरसचा नाश होतो. तर अल्कोहोलचे म्हणजे मद्यसेवन केल्याने कोरोना होणारच नाही.
असा काहीजणांचा गैरसमज आहे. यातूनच अनेकजण मद्यसेवन करत आहेत. पण अल्कोहोलमुळे लिव्हर, किडनीचे नुकसान होते. लिव्हर कमकुवत झाल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्तीही कमकुवत होते. यामुळे मद्यसेवन टाळावे.

जंक फूड
जंक व फास्ट फूड तुम्हांला आवडत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण फास्ट फूड आणि तळलेले पदार्थात कॅलरीज, फॅट, आणि सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे रोगप्रतिकारकशक्तीसाठी योग्य नाही. तसेच अशा पदार्थांमध्ये विटामिन्स आणि मिनरल्सचे प्रमाणही अल्प असते.

- Advertisement -

कॉफी
जर तुम्हाला कॉफी आवडत असेल तर त्यावर वेळीच नियंत्रण आणा. कमीत कमी रात्री झोपताना कॉफी कधीही पिऊ नये. कॉफीमध्ये कॅफिन असते. ज्याचा परिणाम तुमच्या
झोपेवर होऊ शकतो. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होऊ शकतो. यामुळे कॉफी न पिणे उत्तम.

डबाबंद खाद्यपदार्थ
बाजारात मिळणाऱे डबाबंद पदार्थांऐवजी ताजे फळ, भाज्या, आणि घरात बनवलेले पदार्थ खावेत. डबाबंद खाद्यपदार्थांमध्ये रिफाईंड कार्ब्स असतात. जे रोगप्रतिकारकशक्तीसाठी
अनुकूल नसतात.

रिफाईंड पदार्थ
मैदा, व्हाईट ब्रेड, साखर यांचे सेवन कमीत कमी करावे. कारण हे पदार्थ आतड्यांसाठी व पचनासाठी अपायकारक आहेत.


हे हि वाचा – corona pandemic: कोरोनाकाळात आहार कसा असावा?

- Advertisement -